Maharashtra Budget Session Live : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील शेवटचा दिवस
Maharashtra assembly budget session : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज शेवटचा दिवस आहे.

Background
Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानसभा सभागृहाचे कालचे कामकाज सव्वा दहा वाजता संपले. आज (शुक्रवार 17 मार्च ) सकाळी साडेनऊ ते पावने अकरा वाजेपर्यंत विशेष बैठक आयोजीक करण्यात आली आहे. या बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. तर नियमित कामकाज अकरा वाजता सुरू होईल.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे. अनेक मुद्यांवरुन विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना विधानभवन हक्कभंग समितीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर आता आज विधानपरिषद हक्क भंग समितीच्या वतीने देखील नोटीस पाठवण्यात येणार आहे. यासाठी सकाळी साडेअकरा वाजता हक्कभंग समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवण्यात येईल.
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांवरुन विरोधक आजही सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा, शेतकऱ्यांचा लाँग मार्च या मुद्यावरुन विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
काल सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय आदेशवरती चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. चर्चेदरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आयुष्यभर लोकं काम करतात, त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे : थोरात
आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे. आयुष्यभर लोकं काम करतात त्यामुळं त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे असे थोरात म्हणाले. सरकारनं गांभीर्यानं या आंदोलनाकडं पाहिलं पाहिजे. तसेच नाशिकवरुन शेतकरी पायी चालत आले आहेत. त्यांच्या समस्या आहेत म्हणूनचते चालत आले आहे. त्यावर सरकारनं तोडगा काढावा असे थोरात म्हणाले. किसान सभेचा लाँग मार्चला आमदार विनोद निकोले आणि किरण लहामटे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी विधान भावनात निदर्शने करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो...अब्दुल सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या...अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या. अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले आहेत.
Budget Session 2023 : शेतकरी मुद्यावरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणाबाजी
Maharashtra Budget Session 2023 : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज (17 मार्च) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आजही आंदोलन सुरु केलं आहे. 'खोके सरकारचा उपयोग काय शेतकऱ्यांना न्याय नाय' अशा घोषणा विरोधक देत आहेत.
Shashikant Warise : पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला, विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात कबुली
Shashikant Warise Death Case : पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची कबुली सरकारनं कबुली दिली आहे. विधान परिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारच्या वतीनं लेखी उत्तर देण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटीची (SIT) चौकशी सुरु असल्याची देखील माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे.























