(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget Session LIVE: राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे.
LIVE
Background
Maharashtra Budget Session LIVE: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra budget session) आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर (budget) चर्चा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) दुसरा आठवडा सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा (Rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची विरोधकांची मागणी
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. सकाळी पायऱ्यांवर देखील विरोधक घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. कांदा, कोथिंबीर, मेथी, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव नाही. अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कमी दरानं खरेदी केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधक करतायेत.
महाराष्ट्राचे आर्थिक धोरण जाहीर केलं जाणार
दरम्यान, आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरुन स्पष्ट होईल. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार
वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
Maharashtra budget session 2023 : राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती
Maharashtra budget session 2023 : एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे, मुख्यप्रतोदपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधान परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
Maharashtra budget session 2023 : रासायनिक खत खरेदी करताना झालेल्या प्रकाराबद्दल केंद्राला कळवणार : मुख्यमंत्री
Maharashtra budget session 2023 : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. जात विचारून खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आणि सभागृहाची भावना लक्षात घेऊन आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काल ज्या प्रकारे अर्थसंकल्प मांडला आहे त्यामुळं विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळं त्यांची परिस्थिती समजून घ्या असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना जात नसते, पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार
- सांगली जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना खत घ्यायचे असेल तर त्यांना पहिलं जात सांगावी लागत आहे.
- शेतकऱ्यांना जात नसते
- शेतकऱ्यांमध्ये संताप आहे
- जातीचा रकाना भरल्याशिवाय फाॅर्म भरला जात नाही
- पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नाही
- यावरती संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या, शेतकऱ्यांची नाराजी
Farmer Caste Query For Buying Fertilizer : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
Maharashtra budget session 2023 : विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन, राष्ट्रवादीचे आमदार भोपळा घेऊन विधानभवनात
Maharashtra budget session 2023 : विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा घेऊन विधान भवनात प्रवेश करत आहेत. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.