एक्स्प्लोर

Dussehra 2022: महाराष्ट्रातील 'या' गावात रामाची नाही, तर रावणाची होते पूजा; तब्बल दोनशे वर्षांपासून परंपरा

Ravana Temple In Maharashtra : रावणाचे हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान आहे. रावणातील दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील चांगल्या गुणांची इथे पूजा होते.

Ravana Temple In Maharashtra : हिंदू धर्मानुसार, दसऱ्याच्या (Dussehra 2022) दिवशी श्रीरामाने लंकेचा पती रावणाचा वध केला. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं उद्या दसऱ्याला दहन केलं जातं. परंतु महाराष्ट्रात अकोला (Akola) येथील पातूर तालुक्यातील सांगोळा (Sangola) हे गाव याला अपवाद आहे. कारण या गावात रावणाची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थान आहे. रावणातील दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील चांगल्या गुणांची इथे पूजा होते. असे म्हणतात, तब्बल दोनशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.
 
राज्यातील रावणाचे एकमेव  मंदिर

संपूर्ण भारतभर विजयादशमीला रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं. रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत आहे. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो. तपस्वी, बुद्धिमान, महापराक्रमी, वेदाभ्यासी, एकवचनी या गुणांमुळे सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. येथील रावणाचे मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलले जाते. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात.

गावात रावणाच्या मूर्तीचं असं झालं आगमन

सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे.. गावाला अगदी लागूनच गावाची जीवन वाहिनी समजली जाणारी मन नदी वाहते. या मूर्तीच्या आगमनामागची कथाही फार रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषी-मुनीचे आश्रम होते. अडीचशे वर्षांपूर्वी याच नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मुर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले. पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती. दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. मूर्ती घडवली तिथे दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड होते. सिंदोळीचे झाड, अवचित घडलेली ही घटना अन त्यातून ‘लंकेश्वराची मूर्ती’ साकारल्या गेल्याचा हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर 'रावण महाराज' स्थिरावलेत. 

'रावण महाराज' सांगोळावासियांचं दैवत 
ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. मात्र, मूर्ती गावाच्या वेशीवरून समोर हललीच नाही. त्यामुळेच गावाच्या सुरुवातीलाच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या आख्यायिकेबद्दल माहिती ही लिखित नसून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. या घटनेनंतर गेल्या अडीच शतकांपासून 'रावण महाराज' सांगोळावासियांचं दैवत बनलं आहे. येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते. 

एकदा झाला होता मुर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न
सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती 50-60 वर्षांपुर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात. 

रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस

या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे. 

रावणदहन न करण्याचा सांगोळावासियांचा आग्रह
दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. सीतेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. त्यामुळे रावणातील चांगुलपणाला पुजत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांना वाटतं. 

हेच खरं 'सीमोल्लंघन' ठरेल...
रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही होते. मात्र, आजही त्याच्यातील सद्गुण दुर्लक्षित करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच, सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचा दहन करण्याची शपथ दसऱ्याला घेत देश बलशाली करण्याची भावनाच खरं 'सीमोल्लंघन' ठरेल.

संबंधित बातम्या

Dussehra 2022: भारतातील 'ही' आहेत अनोखी आणि अद्भुत मंदिरे! जिथे रावणाची पूजा केली जाते

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget