शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका, प्रकाश आंबेडकरांची परखड प्रतिक्रिया
लता मंगेशकर स्मारकावरुन प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मैदानावर खेळ खेळले जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता या शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मैदानावर खेळ खेळले जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये करा अशी मागणी भाजपनं केली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लता मंगेशकरावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होता. प्रत्येक व्यक्ती तत्त्वाचे पालन करते. लता दीदींनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गायली नाहीत तशीच त्यांनी सरदार पटेल आणि पंडित नेहरुंची देखील गाणी गायली नाहीत.
ओबीसी आरक्षणाबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, मागासवर्ग आयोगाकडे इम्परिकल डाटा आहे की, नाही हे कोणाला माहित नाही. मी तो वाचलेला नाही. त्यावर सध्या प्रतिक्रिया देणं योग्य नाही.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर राम कदमांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही. ही जागा अनेक घटनांची मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावं यावर येत्या काळात वाद देखील होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट