एक्स्प्लोर
महाड दुर्घटना : आज दिवसभरात काय घडलं?
मुंबई/रायगड : महाडमधील पूल कोसळून सावित्री नदीने दोन एसटी बससह काही गाड्या गिळंकृत करुन जवळपास दोन दिवस उलटले आहेत. काल रात्री थांबलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्हा सुरु झाली आणि हादरवून सोडणारी माहिती समोर येऊ लागली. कारण अपघात घडला तिथून तब्बल 130 किलोमीटर अंतरावर पहिला मृतदेह सापडला होता. अरबी समुद्राच्या किनारी दूरवर आंजर्लेजवळ सापडलेला पहिला मृतदेह हा एसटी चालक एस एस कांबळे यांचा होता.
पहिला मृतदेह हाती - ()
साधारण 9 च्या सुमारास दापोलीच्या आंजर्ले किनाऱ्यावर हा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या अंगावर खाकी रंगाचा युनिफॉर्म आणि बॅच नंबरही होता, त्यामुळे तो एस टी चालक एस एस कांबळे यांचा असल्याची खात्री पटली. कांबळे हे जयगड - बोरिवली या एसटीचे चालक होते.
दुसरा मृतदेह
हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावरही आणखी एक मृतदेह सापडला. हा मृतदेह एका वृद्ध महिलेचा होता. त्यांची ओळख पटल्यानंतर हा मृतदेह शेवंती मिरगळ (वय 65) यांचा असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे हरिहरेश्वर हे दुर्घटनास्थळापासून 80 किमी अंतरावर आहे.
जवानांची बोट उलटली
दरम्यान, महाडमध्ये जीवाची बाजी लावून बचावकार्य करत असलेल्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना घडली. मात्र या बोटीतील सर्व जवानांना वाचवण्यात आलं.
महाड दुर्घटना झाल्यानंतर याठिकाणी एनडीआरएफ आणि नौदलाचं बचावकार्य सुरु आहे. अनेक बोटी सावित्रीच्या पात्रात बुडालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत. अशाच एका बोटीला हा अपघात झाला होता. मात्र या बोटीतील सर्व जवान सुखरुप आहेत.
तिसरा मृतदेह
यानंतर काहीच क्षणात तिसरा मृतदेह केंबुर्ली नदीकाठी सापडला. हा मृतदेह संपदा वाझे (वय 35 ते 45) यांचा होता. शेवंती मिरगळ आणि संपदा वाझे या दोघी तवेरा गाडीतून प्रवास करत होत्या. या दोघी ज्या गाडीतून प्रवेश करत होत्या, त्या तवेरामध्ये आणखी ते ७ जण असल्याचं सांगण्यात येत आहे.
चौथा मृतदेह : 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह (पुरुष)
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 38 तासांनी)
कुठे सापडला? : 8 ते 10 किमी अंतरावर सावित्री नदी किनाऱ्यावर दादली भागात
लोहचुंबकाला काहीच चिकटलं नाही
महाकाय लोहचुंबकाद्वारे सावित्रीच्या तळात बेपत्ता वाहनांची जी शोधमोहीम सुरु होती, ती सकाळी साडेअकराच्या सुमारास थांबवण्यात आली. कारण, लोहचुंबक तळातल्या ज्या लोखंडसदृश वस्तूला चिकटलं होतं, ती वस्तू वाहन नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पुन्हा इतरत्र ठिकाणी वाहनांचा शोध घेतला जात आहे.
पाचवा मृतदेह : आवेश चौगुलै (पुरुष)
आवेशच्या पासपोर्टची इन्क्वायरी होती, त्यासाठी आसिफ चौगुले आणि आवेश चौगुले हे मामा-भाचे राजापूर-बोरीवली एसटीने मुंबईला चालले होते. हे दोघही चिपळूनचे रहिवासी आहेत.
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 40 तासांनी)
सहावा मृतदेह : पांडुरंग घाग (पुरुष)
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 40 तासांनी)
सातवा मृतदेह : महिलेचा मृतदेह
कुठे सापडला : घटनास्थळाजवळ
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 42 तासांनी)
आठवा मृतदेह : महिलेचा मृतदेह
कुठे सापडला : महाड शहर परिसरात विसावा हॉटेलजवळ सावित्री नदीकाठी महिलेचा मृतदेह आढळला
कधी सापडला? : गुरुवारी दुपारी (तब्बल 42 तासांनी)
परिवहन मंत्र्यांची घोषणा (सायंकाळी 5.00)
*एसटीतून प्रवास करणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
*दुर्घटनेत मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी किंवा 10 लाख रु, दिवाकर रावतेंची घोषणा
संबंधित बातम्या :
महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला ?
सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली औरंगाबादमध्येही NDRF चं बचावकार्य, पुरात अडकलेल्यांना वाचवलं महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं? देवदूत… काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ! महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ताअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement