एक्स्प्लोर

Nagpur News : उपराजधानीत अवघे 54 टक्के मतदान; 'शेम ऑन यू' म्हणत जागृत मतदारांनी थेट बॅनर झळकावत विचारला जाब 

लोकसभा निवडणुकीत उपराजधानी नागपुरात फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपुरकरांनी आपले मतदानाचं कर्तव्य बजावलच नसल्याने अशाच्या निषेधाचे होर्डिंग सद्या नागपूर शहरात लागले आहेत.

Nagpur Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपराजधानी नागपूरात (Nagpur) फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपुरकरांनी आपले मतदानाचं कर्तव्य बजावलच नाही. हे ऐकून नागपूरकर किती बेजबाबदार आहेत, असंच कोणालाही वाटेल. मात्र नागपूरात कमी मतदानामागे मतदारांची अनास्था हेच एकमेव कारण नव्हते, तर मतदारयाद्यांमधील प्रचंड घोळ, राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची (Election Commission Voter List) घोडचूक इत्यादि अनेक कारणं देखील कारणीभूत असल्याचं आता समोर येऊ लागले आहे. 

मात्र,  असे असले तरी ही आकडेवारी लक्षात घेतली तर एकट्या नागपूर लोकसभा मतदारसंघात (Nagpur Lok Sabha Election 2024) तब्बल 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केलेले नाही. त्यामुळे ज्यांनी मतदानकेंद्रा पर्यंत जाण्याची तसदीही घेतली नाही, तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केला, अशाच्या निषेधाचे होर्डिंग सद्या नागपूर शहरात लागले आहेत. नागपूरच्या ट्राफिक पार्क चौकात लागलेल्या या होर्डिंग वर 'शेम ऑन यू' असा उल्लेख करण्यात आलाय. सध्या हे बॅनर सऱ्यांचे लक्ष वेधत असून चर्चेचे विषय ठरले आहे. 

उपराजधानीत अवघे 54 टक्के मतदान

अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरकडे उपराजधानीत (Nagpur) मतदानात झालेली घट ही एक चिंतेचे बाब मानली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि सर्व स्थरातील यंत्रणा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक कसोशीचे प्रयत्न केलेत. त्यात अगदी विक्रमी उपक्रमही घेतले.

मात्र, 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अशातच मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निवडणूक कामातील हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मतदार यादीतील मोठ्याप्रमाण झालेला घोळ लक्षात घेता दोषींवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे नागपूर शहरातील काही जागृत मतदारांनी थेट बॅनर मधून मतदान न करणाऱ्यांवर टीका केलीय. 

मतदारांनी झळकवले निषेधाचे होर्डिंग 

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 22,23,281 मतदार आहे. त्यापैकी प्रत्यक्षात 12,07,344 मतदान केले. तर उर्वरित 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारण नसतानाही मतदान न करणाऱ्या जागृत नागपूरकर मतदारांनी निषेधाचे होर्डिंग झळकत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget