एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जखमी प्रवाशासाठी रेल्वे दीड किलोमीटर मागे; प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचा सन्मान
रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशासाठी ट्रेन उलटी दीड किलोमीटर मागे नेल्याने रेल्वे कर्माचाऱ्यांचे सर्वांकडून कौतुक होतंय. याची दखल घेत रेल्वे प्रशासनानेही या कर्मचाऱ्यांचा गौरव केलाय.
जळगाव : भरधाव धावणारी एक्सप्रेस ट्रेन एखाद्या प्रवाशासाठी उलटी धावल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण अशी घटना घडलीये जळगावातल्या परधाडे ते माहीजी दरम्यान. देवळाली भुसावळ शटल ट्रेन एका जखमी प्रवाशाला ताताडीचे उपचार मिळवून देण्यासाठी मागे फिरल्याचं बघायला मिळालं. रेल्वे विभागाच्या वतीनेही या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सर्वांकडून कौतुक होतंय. रेल्वे प्रशासनानेही कर्माचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.
शटलने प्रवास करताना पाचोऱ्यातला तरुण, राहुल पाटील परधाडे ते माहिजी गावाजवळ रेल्वेतून पडून जखमी झाला. त्याच्या मित्रांनी चेन ओढून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दीड किलोमीटर पुढे गेल्यावर ही ट्रेन थांबली. जखमी प्रवाशाला मदतीची गरज असल्याचं प्रवाशांनी गार्ड आणि चालकाला सांगितल्यावर या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे पुन्हा मागे फिरली. रेल्वे विभागाच्या वतीनेही या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.
माणुसकीच्या ट्रॅकवर ट्रेन उलटी धावते तेव्हा...
रेल्वे प्रशासनाकडून कर्माचाऱ्यांचा गौरव -
रेल्वे प्रशासन जनतेच्या गौरवाचे धनी झाल्याने रेल्वे प्रशासनाने देखील जखमी तरुणाला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेतली आहे. भुसावळ येथील डीआरेम विवेक कुमार गुप्ता यांनी मोटारमन ए पांडे, सहायक मोटार मन नीरज पांडे आणि गार्ड आर व्ही पारधे यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला. एक हजार रुपये रोख आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या मानवतेच्या कामगिरीचा रेल्वे प्रशासनाला अभिमान असल्याचं डी आर एम विवेक कुमार गुप्ता यांनी म्हटलं आहे.
राहुलच्या कुटुंबीयांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार -
रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि प्रवाशांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपल्या मुलाचा जीव वाचला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि त्यांची भेट झाली तर त्यांचा सत्कार ही करू अशी भावनिक प्रतिक्रिया रेल्वेतून पडलेल्या राहुल पाटील यांचे वडील संजय पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
Rural News | जखमी प्रवाशासाठी ट्रेन दीड किलोमीटर | माझं गाव माझा जिल्हा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement