सांगलीत तळीरामांचा धुमाकूळ; एकाच दिवशी दारुची तीन दुकानं फोडली, लाखोंच्या दारु बाटल्या लंपास
लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद असल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांना आता थेट दारुची दुकानंच लक्ष्य केली आहेत. सांगलीत एकाच दिवशी तीन दारुची दुकानं फोडल्याची घटना घडली.
सांगली : सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी तीन दारुची दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. तळीरामांनी कवठेमहांकाळ आणि मिरजेतील तीन दुकानं फोडून लाखो रुपयांच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत संचारबंदी आहे. अशात दारु पिणाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. तर या लॉकडाऊनमध्येही तळीराम मिळेल त्या किंमतीत दारु विकत घेत आहेत. कारण दारुची सर्व दुकानं सील करण्यात आली आहे. आता तळीरामांची अडचण होत असल्याने त्यांनी थेट दारुच्या दुकानांनाच लक्ष्य केलं आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारी दारुची दुकानं फोडून लाखो रुपयांच्या दारुच्या बाटल्यांची चोरी करण्यात आली.
दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कवठेमहांकाळ इथल्या कुची रोड, काळे प्लॉटवर ओंकार काळे यांचे किनारा परमिट रुम आणि बिअर बारचे शटर उचकटून विदेशी दारु आणि बिअर चोरुन नेली आहे. परमिट रुमच्या मागील दरवाजाचा कुलूप तोडून आणि आतील शटर उचकटून विदेशी आणि बिअर अशी एकूण 75,500 रुपयांची दारु लंपास केली. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.नागपुरात चक्क मेडिकलमधून दारुची विक्री, एकाला अटक
वड पाच्ची अगेन...! तळीरामांकडून आता सरकारी गोदामांना सुरुंग! दारुचोरी रोखण्याचं आव्हान
तर दुसरीकडे मिरजेत वाईन शॉप आणि बिअर बार फोडून लाखो रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातील स्टेशन चौकातील संगम वाईन शॉपीमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. तसेच या वाईन शॉप शेजारी असणाऱ्या अतिथी बिअर बार मध्येही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून विदेशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आणि गल्ल्यात असणारी रोख चोरुन नेली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग तसंच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.
Sting Operation for illegal liquor | पुण्यातल्या बारमध्ये पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन, लॉकडाऊनमध्ये दारू विकणारा लॉकअपमध्ये!