एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात चक्क मेडिकलमधून दारुची विक्री, एकाला अटक
कोरोनामुळं केलेल्या लॉकडाऊनमध्ये दारुचं व्यसन असणाऱ्यांना आपली तलफ कशी भागवायची हा प्रश्न आहे.राज्यात काही ठिकाणी मद्यपींकडून दारुची दुकानं फोडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
नागपूर : कोरोनाविरोधात लढा देताना लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांसाठी मेडिकल स्टोर्सची आवश्यकता सर्वात जास्त आहे. लोकांची हीच गरज लक्षात घेऊनच शासनाने मेडिकल स्टोर्स सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, काही लोकं याचाही गैरफायदा घेत आहेत. नागपुरात एका मेडिकल स्टोअर्समधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोर्समध्ये नियमबाह्य पद्धतीने बियर आणि इतर मद्य विक्री सुरु असल्याची माहिती गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात बिसलरी / मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमध्ये छुप्या पद्धतीने बिअरची विक्री सुरु असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दुकानातून 90 बॉटल्स जप्त करत मेडिकल स्टोर्सचा संचालक निशांत गुप्ता याला अटक केली आहे. या मेडिकल स्टोर्सच्या संचालकांचा एक नातेवाईक बिअर बार चालवतो. त्याच्याकडून बिअरच्या बॉटल्स आणून मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमधून त्याची विक्री सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी मेडिकल स्टोर्स संचालकाला अटक केली असून अशाच पदतीने इतर ही मेडिकल स्टोर्समधून मद्य विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे का याचा शोध सुरु केला आहे.
नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध सुटला
लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध वारंवार सुटताना दिसतोय. त्यामुळंच नागपुरात गेल्या आठवड्यात 6 दिवसात पाच वेगवेगळे बार आणि दारूची दुकान फोडल्याच्या घटना घडल्या. लॉकडाऊनमध्ये यापूर्वीही नागपुरात दारू चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. 31 मार्चच्या पहाटे नागपुरातील सदर परिसरात सुविधा बार मध्ये दारू चोरीची घटना घडली होती, तिथे दोन चोरट्यानी एक लाखांची ब्रॅण्डेड दारू चोरली होती. तर 1 एप्रिलच्या पहाटे खरबी परिसरात आनंद बार एन्ड रेस्टोरेन्ट मध्ये चोरट्यानी भिंत पाडून दारू चोरून नेली होती. तर 2 एप्रिल रोजी मौद्यात देशी दारू दुकानात चोरीचे प्रकरण घडले होते. त्यामुळे गेल्या 6 दिवसात नागपुरात बार आणि दारू दुकानातून महागडी दारू चोरून नेल्याच्या 5 घटना घडल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री बंद असल्याने तळीराम बैचेन झाल्याचे आणि ते दारू चोरीच्या घटना घडवत असल्याचे दिसून येत आहे.
व्यसनी लोकं घेताहेत समुपदेशन
लॉकडाऊनच्या या कालावधीत दारु आणि सिगारेट मिळत नसल्याने या गोष्टीचं व्यसन असलेले अस्वस्थ झालेत. त्यामुळं अशा लोकांकडून समुपदेशनासाठी फोन करण्याचं प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत वाढल्याच पुण्यातील मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे. कुठल्याही व्यसनाच्या शारिरीक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. लॉकडाऊनच्या या कालावधीचा उपयोग शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी करुन घेता येऊ शकतो असं डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement