LIVE BLOG : आज दिवसभरात... 10 नोव्हेंबर 2019

Background
१. शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरेंचा मालाडच्या हॉटेलात मुक्काम, काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेतेही जयपूरला आमदारांच्या भेटीला, राजकीय घडामोड़ींना वेग
२. सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं भाजपला निमंत्रणाचं पत्र, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय, भाजप अपयशी ठरल्यास राष्ट्रवादीचा पर्यायी सरकार देण्याचा विचार
३. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग मोकळा, वादग्रस्त जागा रामलल्लाची, मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश
४. सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला, मात्र अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश, ओवेसी मात्र निकालावर असमाधानी
५. कटुता विसरुन नवा भारत घडवूयात, अयोध्या निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया, सरसंघचालकांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून निकालाचं स्वागत, शांतता राखण्याचं आवाहन
६. नागपूरमध्ये भारत-बांगलादेश दरम्यान आज तिसरा टी-20 सामना, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक























