(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली शहरात आलेला बिबट्या 15 तासांनंतर जेरबंद, बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्यानंतर बिबट्याला केले पिंजऱ्यात जेरबंद
राजवाडा चौकातील एका मेडिकलच्या स्टोअर रूममध्ये या बिबट्याने आसरा घेतला होता. जवळपास पंधरा तास हा बिबट्या रूममध्येच लपून होता. त्यामुळे काल दिवसभर बिबट्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.
सांगली : सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आढळलेल्या बिबट्याला तब्बल 15 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात आले. हा बिबट्या तीन वर्षांची मादी असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजवाडा चौकातील एका मेडिकलच्या स्टोअर रूममध्ये या बिबट्याने आसरा घेतला होता. जवळपास पंधरा तास हा बिबट्या रूममध्येच लपून होता. त्यामुळे काल दिवसभर बिबट्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अडगळीत बिबट्या लपून राहिल्याने अडचणी येत होत्या. बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री दहाच्या सुमारास विठ्ठलला बेशुद्ध करण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात सीलबंद केले गेलेनशार्प शूटर्सनी बंदुकीच्या सहाय्याने बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला रात्री उशिरा कुपवाड येथील वन विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला बेशुद्ध करून पकडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी राजवाडा परिसरात संचारबंदी असताना देखील लोकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
कुत्र्याची केली शिकार
एका टेरेसवर बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आले. वनविभागाने पंचनामा करून कुत्र्याचे शव ताब्यात घेतले आहे. बिबट्याने पूर्ण रस्ता ओलांडून सुमारे आठ ते दहा फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी मारून पडक्या घरात प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा बिबट्या सांगलीत कुठून आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहुन विशेष पथक दाखल
सांगली शहरांमध्ये मध्यवर्ती वस्तीत बिबट्या घुसल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या शहरात दाखल झाला असून सकाळी राजवाडा चौक या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाला आहे. तरी या ठिकाणी असणाऱ्या एका व्यापारी संकुल मध्ये कुत्र्याला ठार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. या ठिकाणीच बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
संबंधित बातम्या :