एक्स्प्लोर
चंद्रपुरात बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला
चंद्रपुरातल्या लोहारा जिल्ह्यात वन अधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवल्यानं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
![चंद्रपुरात बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला Leopard attack on forest officer in Chandrapur latest update चंद्रपुरात बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/15215406/lepord-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंद्रपूर : चंद्रपुरातल्या लोहारा जिल्ह्यात वन अधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवल्यानं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
एका वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. बिबट्याच्या पायाला मार लागला होता. त्याला शोधण्यासाठी वनविभागानं मोहिम सुरु केली होती. आज सकाळी बांबूच्या एका झुडुपात बिबट्या विव्हळत होता. त्याला जाळीत पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र काही वेळाने त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन मारण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही कारवाई केली जात असताना बांबूच्या झुडुपातून बिबट्याने अचानक समोर आक्रमण केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यानं हातात फायबर गार्ड आणि काठीच्या 5 मिनिटं प्रतिकार केला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इंजेक्शन मारुन बिबट्याला जेरबंद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)