एक्स्प्लोर

आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही फसवी घोषणा, 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं; आंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल 

Parbhani News Update : परभणीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते.

परभणी : आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही फसवी घोषणा आहे. गेल्या 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  कृषिमंत्री सध्या धुंदीत आहेत. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर केलाय.  

यंदा राज्यभरातच प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळेच परभणीत आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सभागी झाले होते.  या मोर्चानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  

"मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू अशी घोषणा केली. मात्र मागच्या 110 दिवसात राज्यभरामध्ये जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ फसवी आहे. सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री सध्या वेगळ्याच धुंदीत आहेत. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले जात आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची गरज होती. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.  

परभणी देखील यंदा 90 टक्‍के गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती.  परंतु सरकारने ओला दुष्कार जाहीर केला नाही. याच मुद्यावरून अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या

Dhule : धुळ्यात मिरचीला दराचा 'तडका', उत्पादन घटल्याचा परिणाम, दोंडाईच्या बाजारात मिरचीला 700 रुपयांचा दर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget