ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2025 | सोमवार*
*1*. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आरपार लढाईची घोषणा, गणपती आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम, ओबीसीतूनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार https://tinyurl.com/5c2pnz4k शिंदे समितीने 58 लाख कुणबी नोंदी दिल्या, समिती तुमची, अहवाल तुम्ही स्वीकारला, फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठे कोण? मनोज जरांगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/38zrtnuj
*2*. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही, बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, मनोज जरांगेंचे वक्तव्य https://tinyurl.com/34kyjkpz देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द काढल्यास वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं आमच्यात सामर्थ्य, मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा https://tinyurl.com/2s48kfax आम्ही तुम्हाला चिंधीचोर बोलू का? आपल्या मर्यादेत राहा, अन्यथा तुला सोडणार नाही, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांना थेट इशारा https://tinyurl.com/y9mvma78
*3*. बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष पेटला, हाकेंकडून अजित पवार, विजयसिंह पंडित यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य तर पंडितांकडून हाकेंना श्वानाची उपमा https://tinyurl.com/4p99xrye बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर दगडफेक, आमदार विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आक्रमक, दोन्ही गटांत तुफान धुमश्चक्री https://tinyurl.com/jz2vx995
*4*. आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यात गोरक्षकांकडून हल्ला, सोबतच्या शेतकऱ्यांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप https://tinyurl.com/2kaead9p गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू, सदाभाऊ खोतांचा इशारा https://tinyurl.com/3fyxp84j
*5*. भाजपने भाकरी फिरवली, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड https://tinyurl.com/yn3d6ar7 ठाकरे बंधूंना नडण्यासाठी भाजपने मुंबईच्या अध्यक्षपदी आक्रमक नेता निवडला, कोण आहेत अमित साटम? https://tinyurl.com/4xxvytbh
*6*. आमदार रोहित पवारांचा मंत्री संजय शिरसाटांवर पुन्हा आरोपांचा बॉम्ब, नवी मुंबईत बिवलकरांना जमीन देण्यासाठी शिरसाटांची मेहेरनजर, 12 हजार पानी पुरावे बॅग म्हणून सादर केल्याचा दावा, सिडकोमध्ये 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yck8f2p7
*7*. शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन https://tinyurl.com/yc968eze
*8*. मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला आला, कड्यावरून पडला, 4 दिवसांनी जिवंत सापडला, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/bddhj9fk सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड प्रकरणाला वेगळं वळणं, बेपत्ता नव्हे तर कर्जबाजारी असल्याने बनाव रचल्याचं कारण समोर https://tinyurl.com/5ac75sza
*9*. बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं, इन्स्टाग्रामवर मुलासोबत गळ्यात हात टाकलेला फोटो शेअर केला, बदनामी झाल्यानं नाशिकमधील अल्पवयीन मुलीची आत्महत्या https://tinyurl.com/ycykdvrh मरिनड्राईव्हच्या समुद्रात 24 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ https://tinyurl.com/wburf9wj
*10*. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरुन वादाला तोंड, ट्रोलिंगनंतर सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेकडून व्हिडीओ डिलीट, बचावासाठी अॅड. असीम सरोदे मैदानात https://tinyurl.com/ncz73fb5 अथर्व सुदामेने करमणूक करावे, लोकांना हसवावे आणि स्वत:चं पोट भरावे, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नकोस, ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांचा इशारा https://tinyurl.com/4tm9jcyd
*एबीपी माझा स्पेशल*
फडणवीसच टार्गेट का, सगेसोयरे म्हणजे कोण, मागण्या काय, मुंबईत कधीपर्यंत धडक, चित्रा वाघांवर संताप, मनोज जरांगेंची भूमिका A टू Z https://tinyurl.com/2t5wrp5j
ठाण्याची मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज, आज रात्री क्रेनने डबे ट्रॅकवर उतरवणार, 10 स्थानकं, जाणून घ्या ए टू झेड माहिती https://tinyurl.com/3x42c6cs
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*























