एक्स्प्लोर

Sachin Tendulkar : 'आता आधार कार्ड पाठवू का?' व्हॉईस नोट पाठवा म्हणणाऱ्या यूजरची सचिन तेंडुलकरकडून एका वाक्यात विकेट

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये सचिननं चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

मुंबई : सचिन तेंडुलकरनं रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आस्क मी एनिथिंग हे सेशन रेडिट या प्लॅटफॉर्मवर घेतलं. या सेशनमध्ये एका यूजरनंनं विचारलेल्या प्रश्नाला सचिन तेंडुलकरनं अनोखं उत्तर दिलं. या उत्तरानं मुळं यूजरची बोलती बंद झाली. सचिन तेंडुलकरचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

रेडिटवर सुरु असलेल्या आस्क मी एनिथिंग सत्रात ज्या अकाऊंटवरुन उत्तरं दिली जात होती. ते अकाऊंट सचिन तेंडुलकरचं आहे यावर त्या यूजरचा विश्वास बसत नव्हता. यासाठी त्यानं एक प्रश्न विचारला आणि खरचं सचिन तेंडुलकर आहे का ? पडताळणीसाठी कृपया व्हॉईस नोट पाठवा, अशी कमेंट केली. याच्या उत्तरात सचिन तेंडुलकरनं जे म्हटलं त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिन तेंडुलकरनं त्या यूजरला उत्तर देत म्हटलं की आता आधार देली पाठवू का? सचिन तेंडुलकरच्या या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सचिन तेंडुलकरला त्याची कोणती खेळी सर्वाधिक आवडते असा प्रश्न देखील विचारण्यात आला. याबाबत उत्तर देताना सचिन तेंडुलकरनं 2008 मधील एका कसोटी सामन्यातील खेळी संदर्भातील माहिती सांगितली. 2008 मध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत भारतापुढं चौथ्या डावात 387 धावांचं आव्हान आहे. तेंडुलकरनं त्या मॅचच्या दुसऱ्या डावात नाबाद 103 धावांची खेळी केली. भारतानं या मॅचमध्ये 6 विकेटनं विजय मिळवला.

सचिन तेंडुलकरनं नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या. ज्यामध्ये 100 शतक आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये इंडिया मास्टर्स संघाचं नेतृत्त्व सचिन तेंडुलकरनं केलं होतं. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वात इंडिया मास्टर्सनं फायनलमध्ये वेस्ट इंडीज मास्टर्सला 6 विकेटनं पराभूत केलं होतं.

सचिन तेंडुलकरनं या आस्क मी एनिथिंग या सत्रात 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमधील एक किस्सा सांगितला. वनडे वर्ल्ड कप 2011 च्या फायनलमध्ये एम एस धोनीला वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्याचा सल्ला माझा होता, असं सचिन तेंडुलकरनं सांगितलं. सचिननं त्या मागं दोन कारण होती, असं म्हटलं. डाव्या आणि उजव्या फलंदाजांच्या कॉम्बिनेशन मुळं दोन ऑफ स्पिनरला विचलित करता आलं असतं. याशिवाय मुथय्या मुरलीधरन हा चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळलेला होता, महेंद्रसिंह धोनीनं नेटमध्ये त्याच्या विरुद्ध फलंदाजी केली होती, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget