एक्स्प्लोर

कुणी ED लावली, तर मी CD लावीन.. राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी एकनाथ खडसे यांची फटकेबाजी

एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं. परंतु, त्यानंतर सतत डावलल्यामुळे गेल्या अनेक दिवस नाराज असलेल्या खडसेंनी अखरे भाजपला रामराम ठोकर, राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आज त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

 मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. अखेर आज राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला : खडसे

दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला असल्याचं एकनाथ खडसे प्रवेश करतेवेळी म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं.

मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही : शरद पवार 

अजित पवार नाराज, प्रदेशाध्यक्ष बदलणार ते कोणाचं मंत्रिपद जाणार या सर्व चर्चना शरद पवार यांनी उत्तर दिलं. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरुये. त्यांना नाथाभाऊंची साथ मिळाली. कोरोनामुळे अजित पवार काळजी घेत आहेत. जे मंत्री आहेत ते तसेच असतील, बदल नाही. एक शब्दाने त्यांनी कसली अपेक्षा आहे, काय हवं असं नाथाभाऊ बोलले नाही. त्यांनी काहीच मागणी केली नाही. कोण मंत्री आहेत ते तसेच राहतील.जयंतराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करत आहे.  अजित पवार नाराज, कशाला नाराज.. कोरोना काळात काळजी घ्यावी लागते. जनतेशी बांधिलकी आहे. जितेंद्र आव्हाड, मुंडे, बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला सगळ्यांच्या बाबत काळजी घेत आहोत. अधिक खबरदारी घ्यावी म्हणून सहकारी आले नाही तर काही गडबड नसल्याचे सांगत पवारांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला.

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न : एकनाथ खडसे 

भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे भावूक होत म्हणाले की, 'भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.

खडसेंच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :

1988 - कोथळी गावचे सरपंच झाले. 1990 - मुक्ताईनगर चे आमदार बनले 1997 - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले. 2010 - विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. 2014 - भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले. 2016 - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला

महत्त्वाच्या बातम्या : 

Eknath Khadse | 'निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन', एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दीMumbai Heavy Rain : रस्ते वाहतुकीवर प्रचंड परिणाम,पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगाPun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दीMumbai Rain:पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका; Amol Mitkari , Anil Patil थेट रेल्वे ट्रॅकवरुन निघाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Embed widget