एक्स्प्लोर

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील

एकनाथ खडसेंनी भाजपचा त्याग केला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मुंबई : आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, "एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील." यावेळी "एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला," असंही ते म्हणाले.

"एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही," असंही जयंत पाटील म्हणाले. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली," असंही पाटील यांनी नमूद केलं.

"एकनाथ खडसे यांच्यासह आणखी काही जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. खूप लोक आमच्या पक्षात येणार असं मी म्हणणार नाही. परंतु ज्या नेत्यांना कार्यकर्त्यांचा, जनतेचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आमच्या पक्षात यायचं आहे," असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

समर्थकांकडून जल्लोष दरम्यान भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

खडसेंचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी : रावसाहेब दानवे एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. "एकनाख खडसेंचा निर्णय पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसेंची समजूत काढण्यात पक्ष कुठेही कमी पडलेला नाही. दिल्या घरी सुखी राहा," असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

ओ जानेवाले हो सके तो लौट के आना : सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देणं ही चिंतनाची बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी काहीशा काव्यात्मक शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना', 'सदा खूश रहो ये दुआ है हमारी' अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.

अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी प्रवेशानंतर नाथाभाऊ लगेच मंत्री होण्याची शक्यता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल, असं म्हटलं जात आहे. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget