Laxman Hake on Manoj Jarange Patil : पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांना पाडण्यासाठी मनोज जरागेंनी बैठका घेतल्या; लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप
Laxman Hake on Manoj Jarange Patil : जरांगे फक्त तुलना करत आहे, तुमची पोरं नोकरी लागतात आमची का लागत नाही? आम्ही कधी आमचा माणूस आमदार नाही खासदार नाही म्हणून तुलना केली का? असे लक्ष्मण हाके म्हणाले.
Laxman Hake on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यवस्थेनं मराठा समाज आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा देखील हाके यांनी केला. हाके यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका केली. पवार निवडणुका जिंकण्याचे फक्त मॅनेजमेंट गुरु असून त्यांनी इथले लोक सोबत घेतले असते, तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. यावेळी हाके यांनी मुख्यमंत्री झोपले आहेत. ते मीडिया बघत नाहीत, टीव्ही बघत नाहीत किंवा आंदोलन होत आहेत ते बघत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, आठव्या दिवसानंतर काल (19 जून) जिल्हाधिकारी येऊन गेले. शासन अजून कुठं आहे अशी विचारणा त्यांनी केली. हाके यांनी सांगितले की, मराठा समाजातील उपेक्षित घटक हा फक्त इकॉनॉमिकल मागास आहे. आरक्षण एक केवळ सामाजिक मागासांचा प्रतिनिधित्व करत आहे. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की शासनाकडून योजना घेऊ शकतात पॉलिसी घेऊ शकतात.
आमचा माणूस आमदार नाही, खासदार नाही म्हणून तुलना केली का?
जरांगेंच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, व्यवस्था आणि प्रतिनिधी या तरुणांना समजून सांगत नाही हे सामाजिक मागासालेपणाचे आरक्षण आहे. त्यामुळे तरुणांच्या मनातला संभ्रम दूर केला पाहिजे. जरांगे फक्त तुलना करत आहे, तुमची पोरं नोकरी लागतात आमची का लागत नाही? आम्ही कधी आमचा माणूस आमदार नाही खासदार नाही म्हणून तुलना केली का? त्यांनी सांगितले की, तुमच्या जमिनी गेल्या म्हणता आणि बाराबलुतेदारांकडे जमिनी तरी आहेत का? सातबारा तरी आहे का? जरांगे तू यार लोकसभेला पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी बैठका घेतल्या. गेल्या 78 वर्षात धनगरांचा एकही खासदार झाला नाही, तरी त्या महादेव जानकर यांचा पराभव करण्यासाठी तू बैठका घेतल्या. प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना तुझे मत झाले नाही. भंपक माणसाच्या मागे जनता कशाला जाईल काय योगदान आहे त्यांचं? अशी विचारणा त्यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांची आणि शेतकरी नेत्यांची हयात गेली आहे. जरांगे सारख्यांनी तरुणांच्या मनात भ्रम निर्माण केलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बनिग्रोची गुडघ्यावर बसून माफी मागितली होती. जगातील सुपर पॉवरबद्दल निग्रो बद्दल त्यांची ही भावना असेल तर माझ्या देशातील ज्यकर्त्यांची दलित भटक्या नुकतांबद्दल काय भावना असायला हवी? अशी विचारणा त्यांनी केली.
निवडणुका जिंकायचे फक्त मॅनेजमेंट गुरु
हाके यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार यांना आम्ही जाणता राजा म्हणायचो, पण आता ते निवडणुका जिंकायचे फक्त मॅनेजमेंट गुरु आहे. पहिल्यांदा शरद पवार लक्ष्मण माने, ना. धो महानोहर यांच ऐकायचे. मात्र, आता काही ऐकत नाहीत. त्यांनी इथल्या लोकांना बरोबर घेतल असतं, तर ते कधीच पंतप्रधान झाले असते. आठ पैकी त्यांचे किती ओबीसी उमेदवार आहेत, जे आहे ते फक्त नावाला असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या