एक्स्प्लोर

लढायचं असेल तर पुढं या, यांची औलाद.., कंधारमधील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, जीवे मारण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोप!

ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आता हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नांदेड : जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कारची गुरुवारी (7 नोव्हेंबर)  तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. या लोकांना विचाराची लढाई विचाराने लढता येत नाही. हिंमत असेल तर समोर येऊन हल्ला करा, असे लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी जोपर्यंत कंधार येथील पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला कसा झाला?

"साधारण 9 वाजेच्या सुमारास माझ्या गाडीवर हल्ला झाला. शंभर-दीडशे तरुणांनी येऊन आमच्या गाड्यांचा ताफा आडवला. आम्हाला वाटलं की ते ओबीसी तरूण असतील. कारण गावा-गावात आमचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. पण त्यांच्या हातात काळे झेंडे होते. हातात काठ्या होत्या, त्यांनी तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले होते. विशेष बाब म्हणजे पोलीस विभागाचे लोकही तिथे उपस्थित होते. त्यामुळे हे षडयंत्र आहे. ओबीसीच्या माणसाने आरक्षणाच्या बाजूने बोलायचं नाही, ओबीसीच्या माणसाने निवडणूक लढवायची नाही. निवडणुकीचा अर्ज भरला तर प्रचार करायचा नाही, प्रचाराला जात असेल तर हल्ला करायचा, असं सगळं महाराष्ट्रात चालू आहे. हा महाराष्ट्र आज मणिपूरच्या वाटेने वाटचाल करतोय," असा हल्लाबोल हाके यांनी केला.

पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी

"आम्ही कंधारच्या पोलीस इन्स्पेक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी कंधारला जात आहोत. त्यासाठी हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी जमा होणार आहे. जोपर्यंत त्या पीआयला निलंबित केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही त्या पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मारणार आहोत. माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे," असेही हाके यांनी सांगितले. 

मला जीवे मारण्याचा प्रयत्न

"घटनास्थळी पोलीस होते. पोलिसांना या घटनेची अगोदरच माहिती होती, तर त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही. पोलिसांच्या उपस्थितीत आमच्यावर हल्ला कसा होतो? पोलिसांनी या सर्व प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेले आहे. त्यामुळे आमच्यावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता, असं गंभीर आरोप हाके यांनीक केला. 

....म्हणून असे भेकडासारखे हल्ले 

तसेच, महाराष्ट्रात आमच्यावर कुठेही हल्ला होणार आहे, हे आम्ही गृहित धरलेलं आहे. ते समोर येऊन हल्ला करत नाहीत. आमनेसामने येत नाहीत. तोंड बांधून मागून हल्ला करणारी यांची औलाद आहे. लढायचं असेल तर समोर या. विचारांची लढाई विचारांनी लढा. ही लोकशाही आहे. काठी आणि कुऱ्हाडीने लढावयाची ही लढाई नाही. विचाराने विचाराचा सामना करायची ताकद नसल्यामुळे असे भेकडासारखे हल्ले केले जात आहेत. आम्ही आमचा प्रचार थांबवणार नाही. आम्ही आमच्या माणसांना एकत्र करू,  असा इशाराही त्यांनी दिला.  

Laxman Hake Video News :

हेही वाचा :

Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Embed widget