(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर कोरोनामुक्त; दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजेश टोपे यांनी सांगितलं की, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लता दिदींचे व्हेंटिलेटर काढलं आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. लता दिदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडे देखील घातले.
Mumbai | Veteran singer Lata Mangeshkar's health condition has marginally improved. Her ventilator support was removed two days ago. She will continue to be under observation in ICU: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
— ANI (@ANI) January 29, 2022
(file photo) pic.twitter.com/HPjbdoOHZQ
रुग्णालयात दाखल केल्यापासून लता मंगेशकरांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपीशी संवाद साधताना सांगितले होते की, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच दाखल असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांचं निवेदन
काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका, असं निवेदनात म्हटलं होतं.