एक्स्प्लोर

... म्हणून लाडकी बहीण योजनेचे 3000 रु पुरुषाच्या बँक खात्यात जमा; ZP सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आधार कार्डच्या नंबरमुळे असे झाले असावे.

यवतमाळ : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजना सध्या राज्यात चांगलीच चर्चेत असून विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधक या योजनेवरुन आमने-सामने आले आहेत. राज्य सरकारच्यावतीने आज योजनेबाबतचा मोठा कार्यक्रम होत असून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील 70 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसेही जमा झाले असून महिलांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मात्र, यवतमाळमध्ये (Yavatmal) एका पुरुषाच्या बँक खात्यात (Bank) 3 हजार रुपये जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये लाडक्या बहीणऐवजी पुरुषाच्या खात्यात जमा झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे हा प्रकार घडला असून जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या  बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये शासनाने जमा केले होते. 

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आधार कार्डच्या नंबरमुळे असे झाले असावे. आधार कार्डवर बारा अंकी नंबर असून यात पैसे जमा करतेवेळी शेवटचे चार अंक दिसून येतात. त्यामुळे आधीच्या एखाद्या नंबरमध्ये घोळ झाला असावा, या कारणाने संबंधित तरुणाच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. आम्ही राज्य टेक्निकल टीमकडून याबाबतची माहिती मागविली आहे. जी कोणी महिला या निधीपासून वंचित आहे, त्या महिलेचा शोध घेतल्या जात आहे. हा अर्ज राज्यातून कुठून भरला गेला, याची देखील माहिती मागविली असल्याचं पत्की यांनी स्पष्ट केलं. 

बँक स्टेटमेंटनंतर पुरुषाने दिली कबुली

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसाच एक मेसेज मला सुद्धा आला आहे. माझ्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे. बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे. मी हे खातं 2012 ला उघडलं होतं. पंरतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या कारणाने मी व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर मी यवतमाळला आलो. इथे आल्यानंतर मी खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी करावी लागेल असं सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना सांगून मी स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मी कोणताही अर्ज केलेला नाही तरी पैसे माझ्या खात्यात कसे जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ती आमची प्राथमिकताच नाही!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget