राज्यातील किती महिलांना मिळणार 'लाडकी बहिण योजनेचा' लाभ? सविस्तर माहिती एका क्लिकवर
सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या चार दिवसांनी या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या चार दिवसांनी या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. रक्षाबंधपूर्वी सरकारकडून महिलांना ही भेट मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील नेमक्या किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या 17 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान, राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, योजनेचा अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळालं आहे. मोठ्या संख्येनं पात्र महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट का?
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाऊंटची अट ठेवली आहे. ती अट नेमकी का ठेवण्यात आली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याबाबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली असे तटकरे म्हणाल्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.
जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे 17 ऑगस्टला जमा होणार
माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे 17 ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत हाच हेतू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर होता असे तटकरे म्हणाल्या. ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या:
Ravi Rana : 'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण