एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला! 'नारीशक्ती दूत' अ‍ॅपवर सहा पुरूषांकडून खोटी माहिती

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क सहा 'लाडक्या भावांनी' नारीशक्ती दूत' अॅपवर खोटी माहिती दाखल केली आहे. अकोला शहरातील या सहा व्यक्तींवर आता कारवाई करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojan) आणलीय. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा 'लाडक्या भावांनी' केला आहे. या योजनेसाठी असलेल्या 'नारीशक्ती दूत' अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरूषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांना याचा खुलासा मागविण्यात आलाय. यानंतर त्यांच्यावर कारवाईही  करण्यात येणारेय. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला! 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची (ladki bahin yojana) नोंदणी अजूनही सुरूच आहे. या योजनेचा (ladki bahin yojana) लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. याप्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या प्रकरणात, संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान असाच एक गैरप्रकार अकोल्यातून पुढे आला असून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार!

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (ladki bahin yojana) योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी राज्यात्या कानाकोपऱ्यातून ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज मंजूर झाला आहे. उर्वरित 27 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात दाम्पत्याने बनावट कागदपत्रे दाखवून अनेक अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget