एक्स्प्लोर
सांगलीत कृष्णेला पूर, पाणी पातळी पोहचली 36 फुटांवर
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीतील कृष्णेची पातळी 36 फुटांवर पोहचली आहे.
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी 36 फुटावर पोहचली आहे. तर वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरातील नदी काठच्या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे 25 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीतील कृष्णेची पातळी 36 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे कर्नाळ रोड, दत्तनगर , सूर्यवंशी प्लॉट या भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्याचबरोबर सूर्यवंशी प्लॉटमधील नागरीकांचे महापालिका शाळा नंबर 25 मध्ये स्थलांतर सुरू आहे.
नदीकाठी असणाऱ्या दत्तनगर भागातील नागरिकांना सर्तकतेच्या सुचना देण्यात आल्या असून मध्यरात्री पासून सांगली महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन विभाग, आपत्ती नियंत्रण कक्ष पूर परिस्थिती असलेल्या भागात मदतकार्यात सक्रिय आहे. ज्या भागात पाणी येत आहे तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये निवारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीपातळी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल, असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तर पुराच्या पाण्यामुळे शहरातील नांद्रे -पलूस मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जुना मार्ग बंद झाला आहे.
नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार असून कृष्णा नदी पातळीमध्ये सातत्याने वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, वीज, मोटारी, इंजिने, शेती अवजारे व पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement