एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी बाला रफिकला स्कॉर्पिओ कार भेट

सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी आपल्याला दिलेली स्कॉर्पिओ कार म्हणजे कुस्तीचा फार मोठा मान आहे. म्हणूनच ही नवी गाडी घेऊन देशातील प्रत्येक गावात मातीतली कुस्ती टिकावी आणि वाढावी म्हणून मी प्रयत्न करेन, असं बालाने म्हटलं आहे.

कोल्हापूर : मातीतल्या कुस्तीचा राज्यभर प्रचार व्हावा म्हणून कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला नवी कोरी स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. या गाडीतून बालाने देश, राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्तीचे धडे मल्लांना द्यावे, अशी अपेक्षा सचिन सापळे यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून जगभर ओळखलं जातं. याच कुस्तीच्या पंढरीतून अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असे मल्ल तयार झाले. यास मल्लांना हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्यासह अनेक दिग्गज उस्तादांचा मार्गदर्शन लाभलं. हीच मातीतली कुस्ती राज्यभर नव्हे तर देशभर जावी असा सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांचा उद्देश आहे. बुलडाण्याचा बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी सचिन सापळे यांनी आजवर पश्चिम महाराष्ट्रातील 12 मल्लांचं पालकत्व स्वीकारलं असून अनेक अनाथ मुलं त्यांनी दत्तक घेतली आहेत. तसंच अनेक शाळा डिजिटल केल्या आहेत. असा सामाजिक वारसा असलेले कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. या गाडीतून बालाने देश  राज्यभरातील नव्हे तर भारतातील गावागावात जाऊन मातीतील कुस्ती चे धडे मल्लांना द्यावे अशी अपेक्षा सचिन सापळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच बालाने हिंद केसरी आणि महाभारत केसरी स्पर्धा जिंकावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचं कुस्ती प्रशिक्षण कोल्हापुरात झालं. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाला केसरीने आपले कुस्तीचे धडे गिरवले. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बालाची कोल्हापूरची असलेली नाळ आजही अतूट आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सापळे यांनी आपल्याला दिलेली स्कॉर्पिओ कार म्हणजे कुस्तीचा फार मोठा मान आहे. म्हणूनच ही नवी गाडी घेऊन देशातील प्रत्येक गावात मातीतली कुस्ती टिकावी आणि वाढावी म्हणून मी प्रयत्न करेन, असं बालाने म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष सापळे यांनी संतोष उर्फ भय्या सापळे सामाजिक संस्था आणि कै. सौ वासंती बाळासाहेब सापळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने केवळ कुस्तीचा प्रचार व्हावा आणि महाराष्ट्रातील पैलवानांना सन्मान मिळावा यासाठी हे कार्य सुरु केलं आहे. या कार्याचं कोल्हापुरात कौतुक होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget