Satej Patil : 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार, सतेज पाटलांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Satej Patil : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून टीका केली जातेय. ही निवडणूक लावून मोठी चूक केल्याचं चंद्रकांत दादांच्या लक्षात आलं आहे. 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
2019 ला भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि भाजप युती असताना 2019 साली सेनेचे उमेदवार कुणी पाडले? असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला होता. हे शिवसैनिकांना सगळं माहिती असल्याचे पाटील म्हणाले. आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून टीका जात असल्याचे सतेज पाटील म्हणाले. ही निवडणूक लावून मोठी चूक केल्याचं चंद्रकांत दादांच्या लक्षात आलं असल्याचे पाटील म्हणाले.
भाजपने ही निवडणूक लावली आहे. निवडणूक बिनविरोध करुन राज्यातील जनतेला एक चांगला मेसेज देता आला असता. पण भाजपकडून सुडबुद्धीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप यावेळी सतेज पाटील यांनी केला. ही निवडणूक उत्साहात करण्याची नाही. दुर्देवाने लागली आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की ही निवडणूक साधेपणानं लढवण्याचा असे पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
शिवसैनिकांनो सावध राहा, बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्याचे पाटील म्हणालेत. या शहराला थेट पाईपलाईनंने शुद्ध पाणी मिळालं नाही तर विधानसभा लढवणार नसल्याचे सतेज पाटील म्हणाले होते. ते पाणी कुठे आहे. जनतेनं त्यांना जाब विचारावा असेही पाटील म्हणाले. ही निवडणूक भाजप विकासाच्या मुद्यावर लढवत आहे. 50 वर्ष महाराष्ट्रात तुमच राज्य होतं. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी 50 वर्षात काय केलं ते सांगा असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: