एक्स्प्लोर
दुसरी मुलगी झाल्याने कोल्हापुरात मायलेकीने बाळाला जिवंत पुरलं
लखनला पहिल्या पत्नीपासून चारही मुली झाल्या. मुलाच्या हव्यासातून लखनने पहिल्या पत्नीला माहेरी पाठवून सारिकाशी दुसरं लग्न केलं
कोल्हापूर : नवजात मुलीला जन्मदात्री आणि आजीनंच जिवंत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी झाल्याने नवरा नांदवणार नाही, या धाकाने कोल्हापुरातल्या गडमुडशिंगीत राहणाऱ्या मायलेकीने हा धक्कादायक प्रकार केल्याचा आरोप आहे.
सारिका ही लखन मोरेची दुसरी पत्नी. लखनला पहिल्या पत्नीपासून चारही मुली झाल्या. मुलाच्या हव्यासातून लखनने पहिल्या पत्नीला माहेरी पाठवून सारिकाशी दुसरं लग्न केलं. सारिकालाही पहिली मुलगी झाली. त्यामुळे पुन्हा मुलगी झाल्यास नांदवणार नाही, अशी धमकी लखनने तिला दिली होती.
दुसऱ्यांदाही मुलगी जन्माला येताच सारिका आणि तिची आई नकुशा भोसले हताश झाल्या. अखेर त्यांनी मुलीला पोत्यात भरुन रेल्वे रुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरलं. परिसरातील महिलांना माय-लेकीच्या वागण्याची शंका आल्यानं त्यांनी दोन्ही महिलांकडे चौकशी केली.
मायलेकींनी कबुली देताच पोलिसांच्या मदतीने नवजात बालिकेला पुरलेल्या खड्डयातून बाहेर काढलं. चिमुकलीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement