कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 ऑगस्ट हा धार्मिक सण नसून तो विजयोत्सव आहे. मात्र भाजपकडून प्रत्येक सणाला धार्मिक सण म्हणून पाहिले जात असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला हवं तर पुरणपोळ्यांच्या पार्ट्या द्या, असा टोला सुद्धा लगावला.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्टला काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मांसाहारी दुकाने बंद (Non veg Ban) ठेवण्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मांसाहार बंदीचा निर्णय करण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज (13 ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या सरकारच्या निर्णयावर घणाघाती प्रहार केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा निर्णय देत असतानाच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा सुद्धा त्या संदर्भातील निर्णय असल्याचं सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केलं. मात्र, संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला.
अशी थोतांड करू नका
संजय राऊत म्हणाले की शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ लोटला? तुमच्याकडे अशा प्रकारे कोणी मागणी केली होती का? फडणवीसांना या संदर्भात काही माहिती आहे का? अशी विचारणा राऊत यांनी केली. ते पुढे म्हणाले की केव्हाचे आदेश बाहेर काढले जात आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मग तत्पूर्वी शरद पवार मुख्यमंत्री होते. मात्र, शरद पवार अशा पद्धतीने जर बंदी करत असेल तर ते आश्चर्य असल्याचे ते म्हणाले. अशी थोतांड करू नका, असं संजय राऊत यांनी सुनावलं. ते पुढे म्हणाले की 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नसून तो विजयोत्सव आहे. मात्र भाजपकडून प्रत्येक सणाला धार्मिक सण म्हणून पाहिले जात असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला हवं तर पुरणपोळ्यांच्या पार्ट्या द्या, असा टोला सुद्धा लगावला.
रेडे कापून सत्तेत आले आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला गेला
ते म्हणाले की हे सरकार रेडे कापून सत्तेत आले आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला गेला. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये रेडे, बकरे कापून सत्तेत आलेल्यांना मांसाहाराचा तिटकारा का यावा? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की 65 रेडे कापण्यात आले आणि रेडे कापल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून सुद्धा खावा लागतो ही तेथील परंपरा असल्याचे संजय राऊत म्हणाले. इतर प्राणी सुद्धा त्या ठिकाणी कापले जातात आणि त्यानंतर मांसाहार करावा लागतो. अशा सरकारचे जनक फडणवीस जर शाकाहारी व्हा म्हणून सांगत असतील तर थोतांडपणा बंद करा, असा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
























