एक्स्प्लोर

Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडी सुद्धा उमेदवार देणार; भाजपकडूनही आश्चर्यकारक दोन नावं आघाडीवर!

Vice Presidential election: जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. 74 वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता.

Vice Presidential election: उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीचे नेते 18 ऑगस्ट रोजी भेटू शकतात. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल. उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. 74 वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत होता.

भाजपकडून थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार  

दरम्यान, भाजप या पदासाठी आपल्या विचारसरणीला समर्पित कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकते. सध्या पक्षात ज्या नावांचा विचार केला जात आहे त्यात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आणखी एक नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांचेही आहे.

संसदेत एनडीएकडे बहुमत

  • लोकसभेतील एकूण 542 सदस्यांपैकी एनडीएकडे 293 आणि इंडिया आघाडीकडे 234 सदस्य आहेत.
  • राज्यसभेतील 240 सदस्यांपैकी एनडीएला सुमारे 130 आणि इंडिया आघाडीला 79 खासदारांचा पाठिंबा आहे.
  • एकूणच, एनडीएला 423 आणि इंडिया आघाडीला 313 खासदारांचा पाठिंबा आहे. उर्वरित सदस्य कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत.

कोण आहेत थावरचंद गेहलोत?

थावरचंद गेहलोत सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. 77 वर्षीय गेहलोत हे राज्यसभेत सभागृहाचे नेते राहिले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवले आहे. ते भाजपमधील सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेल्या संसदीय मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत. ते जातीय समीकरणात (दलित) देखील बसतात. ते मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव देखील आहे.

कोण आहेत ओम माथुर? 

ओम माथुर हे सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. 73 वर्षीय माथुर राजस्थानचे आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. त्यांना मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे मानले जाते. माथुर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत.  

उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते?

स्टेप 1: इलेक्टोरल कॉलेजची स्थापना

उपराष्ट्रपतीची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य असतात.

स्टेप 2: निवडणूक अधिसूचना जारी

निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिसूचनेत नामांकनाच्या तारखा, मतदान आणि निकाल असतात.

स्टेप 3: नामांकन प्रक्रिया

उमेदवाराला किमान 20 खासदारांच्या प्रस्तावक म्हणून आणि 20 खासदारांच्या अनुमोदक म्हणून स्वाक्षरी असलेले नामांकन पत्र दाखल करावे लागते.

स्टेप 4: खासदारांमध्ये प्रचार होतो

फक्त खासदार मतदार असतात. म्हणून ही प्रचार मर्यादित क्षेत्रात होते. उमेदवार आणि त्यांचे समर्थक पक्ष प्रचारात सहभागी होतात.

स्टेप 5: मतदान प्रक्रिया सुरू होते

प्रत्येक खासदार उमेदवारांना मतपत्रिकेवर पसंतीच्या क्रमाने (1, 2, 3…) चिन्हांकित करतो.

स्टेप 6: मते आणि निकालांची मोजणी

जिंकण्यासाठी, एखाद्याला एकूण वैध मतांपैकी साधे बहुमत (50 टक्क्यांपेक्षा जास्त) मिळवावे लागते. निवडणूक अधिकारी निकाल जाहीर करतात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget