Kolhapur News: मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे दागिने लंपास; कोल्हापुरात दिवसाढवळ्या डॉक्टरच्या फ्लॅटवर चोरट्यांचा डल्ला
Kolhapur News: फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्यासह हिऱ्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड लंपास केली.

Kolhapur News: कोल्हापूरच्या सीपीआरमधील मेडिसिन विभागप्रमुख डॉ. अनिता अरुण परितेकर यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. कोल्हापुरात न्यू शाहूपुरीत हा प्रकार सोमवारी भर दिवसा घडला. फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्यासह हिऱ्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड लंपास केली. गजबजलेल्या वस्तीत भरदुपारी झालेल्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
50 तोळ्यांचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरट्याने लंपास
चोरट्यांनी बेडरूमधील लाकडी कपाटातील तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध आकाराच्या अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट, हिऱ्याचे टॉप्स असे 50 तोळ्यांचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 55 लाख रुपये आहे. दरम्यान, माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. पोलिसांनी परितेकर यांची फिर्याद घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा हाती लागला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
























