Kishori Pednekar : कमळ हेच शिंदे गटाचं चिन्ह, ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं, त्यांनीच आईला बाजारात विकलं, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं, त्यांनीच बाजारमध्ये आपल्या आईला विकलं असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
Kishori Pednekar : शिवसेना (shivsena) हा पक्ष नव्हे तर कुटंब आहे. हे कुटुंब आहे ते दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं आहे. पण, ज्यांनी शिवसेना वाचवायला निघालोय असं सांगितलं, त्यांनीच बाजारमध्ये आपल्या आईला विकलं असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. कारण नसताना शिंदे गटानं पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. राजकीय क्रौर्य किती भयाण आहे, याची प्रचिती आली असल्याचे पेडणेकर यावेळी म्हणाले. शिंदे गटाचं कमळ हेच चिन्ह असल्याचे त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 चोरांनी पक्षाला या स्थितीत आणलं
ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. याच मुद्यावरुन किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ज्यांनी शिवसेना आमची आहे. शिवसेना वाचवायला निघालो असं सांगणाऱ्यांनी बाजारमध्ये आपल्या आईला विकलं असल्याचा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला. आमच्यातीलच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर यांनी पक्षाला या स्थितीत आणलं आहे. त्यांच्याबद्दलची चीड प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांच्या डोक्यात आहे. अजूनही पोटनिवडणूक सोडली तर बाकीच्या निवडणुका होणं बाकी आहे. त्यामध्ये जनतेची चीड लोकशाहीच्या माध्यमातून दिसून येईल असेही पेडणेकर यावेळी म्हणाल्या. आम्ही खचणार नाही, आम्ही कधीही घाबरणार नाही. आम्ही तेवढ्याचं जोमानं पुढे जावू असे पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
बाळासाहेबांची चिंगारी कोणी संपवू शकत नाही
गेल्या चार महिन्यात चड्डा, नड्डा मोठमोठे केंद्रातले नेते, वाचाळवीर बोलत होते. त्यामुळं चिन्हाबाबत असा निर्णय येणं अपेक्षीत होता कारण या वाचाळविरांच्या तोंडातून जे काही निघत होतं, ते त्यांच्या कानात कोणीतर सांगत होते, असेही पेडणेकर म्हणाल्या. ज्यांनी सांगितले आम्हीच शिवसेना आहोत, त्यांच्यासमोर जे पी नड्डा यांनी शिवसेना आम्ही संपवली असं सांगितले होते. तुम्ही बाळासाहेबांची चिंगारी संपवू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. आज कोठेही जा तुम्ही सगळीकडे लोक चिडीने बोलत आहेत. ही चीड मतांच्या पेटीतून आपल्याला दिसेल असेही त्या म्हणाल्या. शिंदे गटाने कारण नसतानी चिन्हावर दावा दाखवला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गट लढणारच नव्हता तर दावा का केला? असा सवाल पेडणेकर यांनी केलाय. त्यांना हेच अपेक्षीत होते. त्यांना भाजपबरोबरच जायच आहे. त्यांचे चिन्ह कमळच आहे, त्यांना भाजपबरोबरच जायचं असल्याचे म्हणते पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
महत्त्वाच्या बातम्या: