एक्स्प्लोर

Eknath Khadse : वाड वडिलांनी जे कमवलं, ते मुलांनी गमवलं, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठावलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेल्याचे ते म्हणालेत.

Eknath Khadse : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असं म्हणत एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवल्याचे खडसे यावेळी म्हणाले. 

यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा 

आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असे एकनाथ खडसे म्हणाले. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक असल्याचे खडसे म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाबाबत एकनाथ खडसे यांनी ही खंत व्यक्त केली. डोंबिवलीत आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीनं लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित 'लेवा साहित्यिक रत्ने' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि लेवा साहित्यिकाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमाला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

रश्मी शुक्ला यांना क्लीनचेट दिल्याने केसचं भवितव्य अंधारात

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. याबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी रश्मी शुक्ला ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या, त्याचदिवशी रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळेल असं वाटलं होतं असे खडसे म्हणाले. त्यांनी फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना ते त्या ठिकाणी प्रमुख होत्या. माझाही फोन 68 दिवस टॅप करण्यात आला. तो कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला अजूनही मला कल्पना देण्यात आली नाही. FIR दाखल झालेला आहे, चौकशी सुरू असे सांगण्यात येते. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लीन चीट दिलेली आहे. त्यामुळं आता या  केसचं भवितव्य अंधारात असल्याचे खडसे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

Shiv Sena Symbol : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget