एक्स्प्लोर

Kirit Somaiya vs Thackeray Government LIVE : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Kirit Somaiya vs Thackeray Government : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे.

LIVE

Key Events
Kirit Somaiya vs Thackeray Government LIVE : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Background

कराड : किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आहेत. पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्राम गृहात ते पोहोचले आहेत. अशातच कराडमधूनच किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेनंतर ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरिही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. 

कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले... 

किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."

किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती. 

सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा

दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते. 

13:13 PM (IST)  •  20 Sep 2021

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं. 

12:42 PM (IST)  •  20 Sep 2021

कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो : देवेंद्र फडणवीस

हसन मुश्रीफांनी आरोप केलाय की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जातंय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला."

12:42 PM (IST)  •  20 Sep 2021

गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल : देवेंद्र फडणवीस

किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेनं या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवसेनेच्या सुत्रांचं असंही म्हणणं होतं की, मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण कारवाईची काहीही कल्पना नव्हती. याच सर्व घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, नसेल माहिती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची, असा उपरोधिक टोला लगावला आहे. 

12:41 PM (IST)  •  20 Sep 2021

हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी परवाच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की, हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणं ही मित्र या नात्यानं माझी जबाबदारी आहे. माझं नाव घेण्यासाठी आणि माझ्या विरोधा अब्रूनुकसानाचा दावा करण्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे." 

 
12:41 PM (IST)  •  20 Sep 2021

कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको : चंद्रकांत पाटील

कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, असं म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले त्यावर मुश्रीफांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले पाटलांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget