Kirit Somaiya : खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण... किरीट सोमय्यांचं प्रतिआव्हान
Kirit Somaiya Press Conference : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी
Kirit Somaiya Press Conference: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानंतर आज सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावी, असे प्रतिआव्हान दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला.
शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपाची धार आणखीच तीव्र होऊ लागली आहे. किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले. संजय राऊत यांनी कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावे असे सोमय्या यांनी म्हटले. कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. सगळे पुरावे दिले तरी कारवाई होत नसल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. त्याऐवजी संजय राऊत आम्हाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर राग काढायचा होता तर नील सोमय्या यांच्यावर आरोप करण्याची आवश्यकता नव्हती असेही सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पाच वर्षापूर्वीची माहिती दिली. आमची खुशाल चौकशी करावी आम्ही तयार आहोत असे प्रतिआव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप
किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी भागिदारीत बंगल्यांची खरेदी केली असल्याचा आरोप केला. बंगले खरेदी केलेच नसतील तर मालमत्ता कर का भरला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : ईडीची धमकी देऊन सोमय्यांनी कोट्यवधी जमवले, अधिकाऱ्यालाही 15 कोटी; राऊतांचा खळबळजनक आरोप
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
- Sanjay Raut : शिवसेना-भाजप वादाचा दुसरा अंक; किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha