Borivali Kidnapping Case: बोरीवलीत शेअर ब्रोकरचं अपहरण; एका तासात पोलिसांनी लावला छडा, कारण ऐकून बसेल धक्का
Borivali Kidnapping Case: ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
Borivali Kidnapping Case: मुंबईच्या बोरिवली परिसरात एका शेअर ब्रोकरचं अपहरण केल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शर्तीचे प्रयत्न करून पोलिसांनी अवघ्या एका तासात संबंधित ब्रोकरची सुटका करून आरोपीला गजाआड केलंय. अपहरण करण्यामागचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
प्रियंका लखानी असं शेअर ब्रोकरचं काम करतात. लखानी हे बोरिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात. आरोपी अक्षय सुराणानं प्रियांककडं गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते. हे पैसे बुडाल्यानं अक्षय हा लखानीकडे पैशा़ची मागणी करत होता. मात्र, लखानीकडं पैसे नसल्यानं तो ती रक्कम परत करू शकत नाही. 27 जानेवारीला अक्षय त्याच्या मित्राना घेऊन सत्यानगर येथील भगवती हॉटेलजवळ आला. तेथे लखानीला त्यानं जबरदस्ती गाडीत बसवून नेलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
बोरिवलीमधील हा शेअर ब्रोकरचा अपहरणाचा सर्व प्रकार तिथे असलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अपहरण करता आपला 4 साथीदारांसोबत भगवती हॉटेल जवळ उभा आहे. त्याठिकाणी आरोपीनं प्रियंका लखानीला बोलावलं सुरुवातीला काहीवेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर मारहाण करून त्याला एक लाल रंगाचे कारमध्ये बसून आरोपीनं अपहरण केलं. याच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बोरिवली पोलिसांनी एका तासाच्या आत या अपहरणच्या छडा लावला.
गाडीत जबरदस्ती बसवून अक्षय लखानीला घेऊन जे एस टर्स फुटबॉल ग्राऊड, बोरिवली आयसी कॉलनी येथे आला. जो पर्यंत 3 लाख रुपये परत करत नाही, तोपर्यंत लखानीला सोडणार नाही, अशी धमकी त्यानं दिली. प्रियांकचे अपहरण झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळल्यानंतर प्रियांकच्या घरच्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक दृष्टा तपास करून लखानी आणि अक्षत यांचा ठाव ठिकाणा शोधून काढत प्रियांकची सुटका केली, अशी माहिती बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव जाधव यांनी दिलीय.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षयला अटक करून त्यांच्याविरोधात 364 (अ), 387 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर, अक्षयच्या इतर 3 साथीदारांचा बोरीवली पोलीस शोध घेत आहेत.
- हे देखील वाचा-
- तब्बल 22 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं कोट्यवधींचं सोनं! 1998 साली पडलेला कुलाब्यात दरोडा
- इंग्रजीच्या भीतीनं साताऱ्यात विद्यार्थीनीची आत्महत्या तर कोल्हापुरात शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha