एक्स्प्लोर
कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयातच दारुपार्टी

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतल्या पालिका कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर आला आहे. पालिकेच्या ग प्रभागक्षेत्रातील कार्यालयात फेरीवाला विरोधी पथकानं चक्क दारुपार्टी केल्याचं उघडकीस आलं आहे. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास तीन ते चार पालिका कर्मचाऱ्यांची ही दारुपार्टी सुरु होती. पार्टीची चाहूल पत्रकारांना लागली असता कर्मचाऱ्यांनी ठिकाणावरुन पळ काढला. कार्यालयातील तळ मजल्यावर असलेल्या फेरीवाला पथकाच्या स्टोअररुमला बाहेरुन टाळं लावल्यानं पत्रकारांना संशय आला. दार उघडतानाचा आवाज आल्यानं दारुड्या कर्मचाऱ्यांनी पोबारा केला. स्टोअर रुममध्ये विदेशी दारुची बाटली, सिगरेट, दारुचा ग्लास, चणे या गोष्टी आढळल्या. कामाच्या ठिकाणी दारुपार्टीत मश्गुल असणाऱ्या तळीरामांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा























