एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
JOB Majha : ठाणे महानगरपालिका येथे नोकरीची संधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 325 जागांसाठी यवतमाळमध्ये येथे नोकरीची संधी आहे.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळमध्ये 325 जागा
- पोस्ट – योग प्रशिक्षक/ योग इन्स्ट्रक्टर
- एकूण जागा – 324
- शैक्षणिक पात्रता - YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 , योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2, योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D., योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A
- नोकरीचं ठिकाण – यवतमाळ
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालयासमोर
- अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021
- थेट मुलाखत होणार आहे. – 5 ऑक्टोबर 2021
- अधिकृत वेबसाईट - www.yavatmal.gov.in
ठाणे महानगरपालिका
विविध पदांची भरती निघाली आहे.
- पहिली पोस्ट – वैदयकीय समाजसेवा अधीक्षक
- एकूण जागा – 03
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापिठाची मास्टर इन सोशल वर्कर ही पदवी उत्तीर्ण, शासकीय/निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव.
दुसरी पोस्ट – आरोग्य निरीक्षक
- एकूण जागा – 3
- शैक्षणिक पात्रता - शासन मान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षक कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक, शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव.
तिसरी पोस्ट - सी.एस.एस.डी. सहाय्यक
- एकूण जागा – 03
- शैक्षणिक पात्रता - शासन मान्य संस्थेकडील ITI, मशिननिस्ट, NCTVT परिक्षा उत्तीर्ण आणि बारावी पास, शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये CSSD विभागामध्ये काम केल्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
चौथी पोस्ट - औषध निर्माण अधिकारी
- एकूण जागा – 03
- शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त संस्थेतील D.Pharma/B.PharmCourse, शासकीय निमशासकीय अथवा नामांकित रुग्णालयातील काम केल्याचा किमान २ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण – ठाणे
- थेट मुलाखत होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता - राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
- अधिकृत वेबसाईट - www.thanecity.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन माहितीमध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- मुलाखतीची तारीख – 27 सप्टेंबर 2021 आणि वेळ आहे सकाळी 11.30 वाजता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement