Job Majha : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत मेगाभरती होत आहे. विविध पदांच्या 1 हजार 128 जागांसाठी भरती होत आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पहिली पोस्ट - वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- एकूण जागा - 152
- शैक्षणिक पात्रता - MBBS आणि 2 वर्षांचा अनुभव
दुसरी पोस्ट - वैद्यकीय अधिकारी (आयुष)
- एकूण जागा - 72
- शैक्षणिक पात्रता - BAMS/BUMS/BHMS/BDS आणि दोन वर्षांचा अनुभव
तिसरी पोस्ट - भिषक तज्ज्ञ
- एकूण जागा - 8
- शैक्षणिक पात्रता - MD (मेडिसीन) आणि दोन वर्षांचा अनुभव
चौथी पोस्ट - बालरोग तज्ज्ञ
- एकूण जागा - 4
- शैक्षणिक पात्रता - MD (पेडियाट्रीक) आणि दोन वर्षांचा अनुभव
पाचवी पोस्ट - हॉस्पिटल मॅनेजर
- एकूण जागा - 20
- शैक्षणिक पात्रता - रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
सहावी पोस्ट - स्टाफ नर्स
- एकूण जागा - 468
- शैक्षणिक पात्रता - GNM/B.Sc (नर्सिंग)
सातवी पोस्ट - फार्मासिस्ट
- एकूण जागा - 68
- शैक्षणिक पात्रता - B.Pharm/ D.Pharm
आठवी पोस्ट - लॅब टेक्निशियन
- एकूण जागा - 52
- शैक्षणिक पात्रता - B.Sc आणि DMLT
नववी पोस्ट - एक्स-रे टेक्निशियन
- एकूण जागा - 36
- शैक्षणिक पात्रता - एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी
दहावी पोस्ट - वॉर्ड बॉय
- एकूण जागा - 148
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
- नोकरीचं ठिकाण - भिवंडी
- अर्ज तुम्ही पोस्टाने तसंच ईमेल आयडीवरही पाठवू शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी
ईमेल आयडी आहे- bncmc.est@gmail.com
अधिकृत वेबसाईट - bncmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर भरतीवर क्लिक करा. डाव्या बाजूला असलेल्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडील विविध पदांची जाहिरात व अर्ज यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021