एक्स्प्लोर

Jitendra Awhad: तुमच्यात धमक होती तर काढा ना नवा पक्ष, कुणी अडवलंय; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला अजित पवारांचा शिंदे गटावरील 'तो' व्हिडीओ

Jitendra Awhad Shared Ajit Pawar Video : अजित पवारांनी ज्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला होता त्याप्रमाणे त्यांनीही नवीन पक्ष काढावा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला. 

मुंबई : राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यानंतर (NCP Crisis) सुरुवातीचे काही महिने अगदी शांतपणे गेली. नेते एकमेकांना भेटायचे, कार्यकर्ते एकमेकांशी बोलायचे असं सर्व काही आलबेल असल्यासारखं चित्र होतं. अजित पवार गटाकडून कर्जतमध्ये पक्षाचा मेळावा घेतला आणि राष्ट्रवादीतील ही फुट आणि नेत्यांतील वाद मात्र चव्हाट्यावर आला. अजित पवारांनी शरद पवारांबद्दल अनेक गौप्यस्फोट केले तर शरद पवार गटाकडूनही त्याच भाषेत उत्तर देण्यात आलं. आता शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळची अजित पवारांची उक्ती आणि आताची कृती ही वेगळी असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलंय

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवारांनी शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसतंय. शिंदे गटाने शिवसेनेतून फुटल्यानंतर पक्षाचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला. निवडणूक आयोगातील लढाईही त्यांनी जिकंली होती. त्यानतंर अजित पवारांनी एका जाहीर सभेत त्यावरून एकनाथ शिंदेंवर चांगलीच टीका केली होती. त्यामध्ये अजित पवारांनी शिंदे गटाला शिवसेना पक्ष न चोरता नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिल्यांच दिसतंय. 

या व्हिडीओमध्ये अजित पवार काय म्हणाले? (Jitendra Awhad Shared Ajit Pawar Video) 

ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला. हा निर्णय जरी निवडणूक आयोगाने घेतला असला तरी जनतेला तो पटलाय का? याचाही विचार झाला पाहिजे. अरे तुमच्यात जर धमक होती तर काढा ना वेगळा पक्ष, कुणी अडवलं होतं. 

काय म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी? 

दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवार साहेबांनी केल, त्याच संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हादेखिल पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण  देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्या ना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करुन दाखवा.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Full Speech Indapur : NCP प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे मोठे गौप्यस्फोटAdiwasi MLA Mantralaya : मंत्रालयात आदिवासी आमदारांनी थेट जाळीवर उड्या घेतल्या, वातावरण तापलंHarshwardhan Patil Indapur : हर्षवर्धन म्हणाले, राष्ट्रवादीत प्रवेश  करायचा का? कार्यकर्ते म्हणाले..TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून योजनेचे स्वागत करावं, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
तर काकाने मनाचा मोठेपणा दाखवून लाडकी बहीण योजनेचे स्वागत करावं, आशिष देशमुख यांचे अनिल देशमुखांना आवाहन
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज? पुढील 2 दिवसात ठोस निर्णय घेणार
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Embed widget