एक्स्प्लोर
जिग्नेशच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, मग संघाला का दिली? : अर्जुन डांगळे
पुण्यातल्या मेवाणीच्या सभेला परवानगी नाकारली गेल्यानंतर संघाच्या कार्यक्रमाला कशी परवानगी मिळते'', असा सवाल रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केला आहे.
मुंबई : ''कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जिग्नेश मेवाणी सहभागी होणाऱ्या कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारली, तर दुसरीकडे देशभरात 18 ठिकाणी संघाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे पुण्यातल्या मेवाणीच्या सभेला परवानगी नाकारली गेल्यानंतर संघाच्या कार्यक्रमाला कशी परवानगी मिळते'', असा सवाल रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केला आहे.
गोव्यातील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर संघाच्या नव्या वेशात दाखल झाले. तर राज्यात ठाणे, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहे. विखुरलेला हिंदू समाज एकत्र आणण्याचा संघाचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
''राज्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जिग्नेश मेवाणीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, छात्र भारतीचं संमेलन होऊ दिलं नाही, पण संघाचा कार्यक्रम होतोय, हे पक्षपातीपणाचं धोरण आहे'', असं अर्जुन डांगळे यांनी म्हटलं आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement