एक्स्प्लोर
राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मंत्री जयकुमार रावलांचा ठेका
धुळे : रोजगार हमी योजना, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या गावी दोंडाईचात आल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यानिमित्त जयकुमार रावल यांची दोंडाईचा शहरातील प्रमुख मार्गावरून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. रावल यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ही स्वागत मिरवणूक आली असताना, मिरवणुकीत सुरु असलेल्या वाद्यावर मंत्री जयकुमार रावल स्वत: थिरकले.
रावल एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानाकडे पहात विजयाचा सिम्बॉल V दाखवत, थम म्हणजे अंगठा देखील दाखवला.
मंत्री जयकुमार रावल थिरकल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अधिकच उधाण आलं. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून हेमंत देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement