एक्स्प्लोर

Maharashtra Politics | विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटलांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून नोंद

राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच भाजपला सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याने, पक्षाच्या इतर आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

मुंबई : जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण विधीमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत विधीमंडळ गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आता जयंत पाटलांचा व्हीप लागू होईल, हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे, तर अजित पवार आणि भाजपला मात्र यामुळे धक्का बसेल, असं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र सोमवारी (25 नोव्हेंबर) दिलं. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते किंवा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल, त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो. विधीमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती 30 दिवसांत विधानसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे, असं राजेंद्र भागवत यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धाकधूक, शरद पवारांकडून दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच भाजपला सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याने, पक्षाच्या इतर आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. गटनेता म्हणून अजित पवार यांनी जारी केलेला व्हीप बंधनकारक असल्याने पक्षाचे आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. परंतु महाविकास आघाडीची सोमवारी (25 नोव्हेंबर) ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निलंबित नेत्याला व्हीपचा अधिकार नसतो, असं सांगत आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता जयंत पाटीलच व्हीप असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आमदारांची धाकधूक काहीशी कमी झाली असावी. गटनेता म्हणून अजित पवारांच्या नावाची विधीमंडळात नोंद नाही राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे केली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती विधीमंडळात दिल्यामुळे तेच पक्षाचे विधीमंडळ गटनेते असतील, असं म्हटलं जात आहे. तर काँग्रेसने अद्याप गटनेताच निवडलेला नाही. ही निवड कधी करायची हा पक्षाचा अधिकार असतो. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget