एक्स्प्लोर

शिवसेना, राष्ट्रवादी, काँगेसच्या 162 आमदारांचं महाशक्तीप्रदर्शन, भाजपच्या गोटात शांतता

आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसताना त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली आहे. परंतु भाजपकडे सत्तास्थापन करण्यासाठीचे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. कारण आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी 162 पैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार काही कारणास्तव अनुपस्थित होते. जसे की, सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आहेत. राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार नरहरी संध्याकाळी दिल्लीत होते. ते विमानाने मुंबईत येत आहेत. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसताना त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याचे सांगितले होत. आमच्याकडे 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केला होता. राऊत यांनी माध्यमांना असे आवाहन केले होते की, तुम्ही हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे या आणि पाहा. त्यानंतर महाविकास आघाडीने हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शक्तीप्रदर्शन केले. हॉटेल ग्रॅण्ड हयात येथील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच यावेळी आमदारांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले, ओळख परेडही झाली. ओळख परेड पार पडल्यानंतर उपस्थित सर्व आमदारांना आणि नेत्यांना एकजुटीची शपथ देण्यात आली. सध्या भाजपकडून वेगवेगळ्या मार्गांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना एकजुटीची शपथ देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्रदेखील दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
Aaple Sarkar: मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
Gadchiroli Crime: भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Embed widget