एक्स्प्लोर

शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत

James Laine Controversial Book : 2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या आपल्या पुस्तकाबद्दल जेम्स लेन यांनी मोठा खुलासा केलाय.

James Laine Controversial Book :  राज्यात सध्या चर्चेत असलेल्या जेम्स लेन प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. हा खुलासा दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः जेम्स लेन यांनी केलाय . इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना ई मेलवरून दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेनने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह  कोणीही त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी माहिती दिली नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत आपण कधीही चर्चा केली नसल्याचं जेम्स लेनने या मुलाखतीत म्हटलंय. मात्र जेम्स लेन यांच्या या मुलाखतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. जेम्स लेनच्या या मुलाखतीनंतर आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे .

2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या आपल्या पुस्तकाबद्दल जेम्स लेन यांनी मोठा खुलासा केलाय. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी ई मेल मार्फत अमेरिकेत असलेल्या लेनशी संपर्क साधून त्यांचं या वादग्रस्त प्रकरणाबाबतच म्हणणं जाणून घेतलय .

प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली ?
हा प्रश्नच मुळात चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलाय .  बाबासाहेब पुरंदरेच नव्हे तर हे पुस्तक लिहिण्यासाठी मला कोणीही माहिती पुरवलेली नाही.  माझं पुस्तक हे या विषया बाबतच्या कथा आणि त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या विचारसरणीबद्दल आहे. उदाहरणार्थ - काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध रामदास स्वामींशी जोडतात तर काहीजण शिवाजी महाराजांचा संबंध संत तुकारामांशी जोडतात. या दोघांपैकी कोण बरोबर आणि कोण चूक हे मी या पुस्तकात सांगितलेले नाही, तर दोन्ही बाजूचे लोक अशी मतं का मांडतात याबद्दल या पुस्तकात मी लिहलंय.

प्रश्न - तुम्ही या पुस्तकात दिलेल्या माहितीचे स्त्रोत काय आहेत ?
उत्तर - जो कोणी माझे पुस्तक बारकाईने वाचेल त्याच्या लक्षात येईल की मी या पुस्तकात इतिहास सांगण्याचा दावा केलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय असं ज्यांना वाटतं त्यांचा गैरसमज झालाय. कारण मी इतिहास सांगण्याचा कुठंही दावा केलेला नाही तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासाबद्दल ज्या कथा आणि आणि प्रावाद अस्तित्वात आहेत त्याबाद्दल या पुस्तकात मी लिहलंय.

प्रश्न - तुम्ही बाबाहेब पुरंदरेंसोबत कधी या विषयावर चर्चा केली होती का? आणि केली असेल तर त्यांचं या विषयावर काय मत होतं.
उत्तर - मी बाबासाहेब पुरंदरेंसोबत कधीही चर्चा केलेली नाही .

प्रश्न - जेव्हा तुम्हाला या पुस्तकातील मजकुराबाबत माफी मागावी लागली आणि तो मजकूर मागे घ्यावा लागला तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना होता.
उत्तर - मी या पुस्तकातील मजकुराचे लेखन करताना पुरेसा सावध नव्हतो आणि त्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागला याचं मला दुःख आहे .

प्रश्न - बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांनी लोकप्रिय केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांबद्दल तुम्हाला काय वाटतं ?
उत्तर - बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जनमानसात पोहचवणारे प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांची ही ओळख बराच काळ कायम राहणारी आहे. पण त्यांच्यावर 18 व्या आणि 19 व्या शतकात घडलेल्या काही घटनांमुळे टीका करण्यास सुरुवात झाली. या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काहीजणांनी क्षत्रिय मानण्यास नकार दिल्याने असं झालं. मात्र यामुळे एकाच इतिहासाकडे बघण्याचे मराठा दृष्टिकोन आणि ब्राम्हण दृष्टिकोन असे दोन दृष्टिकोन तयार झाले .

प्रश्न - जेव्हा तुम्ही दीड दशकांपूर्वी लिहिलेल्या पुस्तबद्दल आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या वादांच्या बातम्या वाचता तेव्हा तुम्हाला काय वाटत ?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान नायक होते . त्यांच्या चारित्र्याचा उपयोग अभ्यासासाठी न करता समकालीन राजकारणासाठी होत असल्याचं पाहून मला दुःख होतंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget