Jalna Maratha Andolan : आंदोलनस्थळी दगडफेक, हवेत गोळीबार; जालन्यातील मराठा आंदोलन घटनेतील आतापर्यंतचे 10 मुद्दे
Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते. मात्र आंदोलनकांना उपोषणासाठी (Jalna Maratha Reservation Protest) विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यावेळी आक्रमक आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
1. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते.
2. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.
3. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी पोलिस आणि आंदोलकांमध्ये दोन वेळा चर्चा झाली. पण त्यातून काही साध्य झालं नाही.
4. पावने सहाच्या सुमारात पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी आला. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला.
5. उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला.
6. प्रकरण चिघळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलकांनी दगडफेक सुरू केली
7. यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला.
8. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दोनदा हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.
9. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलकांकडून धुळे- सोलापूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली.
10. मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं असून त्यांना अज्ञान स्थळी नेण्यात आलं आहे.
जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर (Jalna Maratha Reservation Protest) आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा इशारा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला आहे. तर गृहखात्याकडून घेतलेली भूमिका ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ही बातमी वाचा: