OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासनं द्याव, तरच उपोषण मागे, लक्ष्मण हाकेंचा इशारा
ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) द्यावं, तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नसल्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय.
Jalna Laxman Hake on OBC Reservation : अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचं आमरण उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्यपालांनी द्यावं, तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नसल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सरकारकडून अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी द्यावी. तोपर्यंत आपण उपोषणातून माघार घेणार नाही असा इशारा हाके यांनी दिला आहे. त्यामुळं आता हाकेंच्या या इशाऱ्यानंतर सरकार काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोकशाही आणि सनदशील मार्गाने आमचं उपोषण सुरु
राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. लोकशाही आणि सनदशील मार्गाने आम्ही उपोषण करतोय, हातामध्ये काठ्या, कुराडी घेऊन आंदोलन करत नाही असे मत हाकेंनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, यापूर्वी ओबीसींची तीन आंदोलन झाली होती. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही याचे आम्हाला दुःख आहे. त्यामुळे शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते असल्याचे उघड झाल्याचे हाकेंनी म्हटलं होतं.
जरांगे पाटील यांनी नुकतच त्यांचं उपोषण स्थगित केलं
दरम्यान, जरांगे पाटील यांनी नुकतच त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच्या सोयऱ्यांनाही सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: