Jalna : जालन्यातील चांदईमध्ये राडा; पोलिसांवर दगडफेक, 250 जणांवर गुन्हे, 18 जणांना अटक
Jalna Chandai News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये पोलिसांकडून दगड मारणाऱ्यांचा शोध सुरूच असून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्याचा आरोपींचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
Jalna Chandai News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. गावातील कमानीला नाव देण्यावरुन हा वाद पेटला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच आणि उपसरपंचासह 18 जणांना अटक केलीय. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे काल पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून गावातील सरपंच आणि उपसरपंच सह पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं आहे. काल झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला होता. दगडफेकीत पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले असून सहा सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अनधिकृतपणे उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला असून ती कमान देखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, गावात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
कालच्या पोलिसांवरील दगडफेक प्रकरणातील 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सरपंच आणि उपसारपंचांसह 18 जण अटकेत आहेत. पोलिसांकडून दगड मारणाऱ्यांचा शोध सुरूच असून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्याचा आरोपींचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या व्हिडीओमध्ये काही युवक दगड हातात घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. तसेच समोरुन पोलिस व्हॅन येण्याची वाट पाहत ते रस्त्याच्या कडेला उभे दिसत असून जशी पोलिस व्हॅन समोर येते त्यावेळी हे युवक त्या व्हॅनवर दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. दगडफेक होत असल्याचं दिसताच पोलिसांनी ती व्हॅन न थांबवता तिथून पुढं नेल्याचं दिसत आहे.