Sharad Pawar : इंडिया नावावरुन सरकारमध्ये अस्वस्थता का? राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा थेट मोदी सरकारला सवाल
Sharad Pawar On India : देशाच्या निगडित असलेल्या इंडिया नावाबाबत सरकारच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता का आहे? हे समजत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
![Sharad Pawar : इंडिया नावावरुन सरकारमध्ये अस्वस्थता का? राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा थेट मोदी सरकारला सवाल Jalgaon latest News Why discomfort in government in name of India? Sharad Pawar's question to Modi government Maharashtra News Sharad Pawar : इंडिया नावावरुन सरकारमध्ये अस्वस्थता का? राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा थेट मोदी सरकारला सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/05/ebf93fb98175048c3c2982b2e256ff1e1693902812824738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : इंडिया (I.N.D.I.A) नाव काढण्याबाबत आम्हाला माहीती नाही, मात्र इंडिया हे नाव हटविण्याचा कोणाला अधिकार नाही, तसेच हे नाव कोणीही हटवू शकत नाही. देशाच्या निगडित असलेल्या इंडिया नावाबाबत सरकार आणि सरकारशी संबंधित पक्षाच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता का आहे? हे मला समजत नाही, असे सांगत उद्याच्या इंडिया बैठकीत यावर चर्चा करू अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून शहरातील सागर पार्क येथे जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला राज्यातील दुष्काळ सदृश्य (Maharashtra Drought) परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केल्यानंतर अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. यात इंडिया हे नाव काढण्यावरून सध्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा आहेत. यावर शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा देताना 'इंडिया हे नाव हटवायचा कुणाला अधिकार नाही, हे नाव कोणीही हटवू शकत नाही' देशाच्या निगडित असलेल्या इंडिया नावाबाबत सरकार आणि सरकारशी संबंधित पक्षाच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता का आहे? हे मला समजत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भारत (Bharat) देशाशी संबंधित असलेले इंडिया हे नाव काढण्याबाबत चर्चा सुरु आहे. यानुसार इंडिया हे नाव काढण्यासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाईल, ते नाव हटवण्यासाठी केंद्राकडून आणि भाजपकडून मागणी केली जात आहे. यावर शरद पवार मोदी सरकारवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. इंडिया हे नाव हटवायचा कुणाला अधिकार नाही, हे नाव कोणीही हटवू शकत नाही, असा इशाराच पवार यांनी दिला आहे. उद्या इंडिया आघाडीत सहभागी असणाऱ्या पदाधिकारीची बैठक होणार असून यावर चर्चा करू असंही पवार म्हणाले.
लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
तसेच वन नेशन वन इलेक्शन (One Nation One Election) यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या बैठका होत आहे. सर्व स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इंडियाच्या बैठकीत अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे इंडियाच्या बैठकीची दखल घेण्यात आली म्हणून इतर विषयाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रयत्न अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'वन नेशन वन इलेक्शन'. एक देश एक निवडणुकीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती आहेत. या समितीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यात घेतलं नाही. मात्र काहीतरी करून अन्य विषयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केलं आहे. माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली एखादी समिती गठीत केल्याचं यापूर्वी कधी बघितले नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांच मत जाणून घ्यायला हव होते. मात्र लोकांचे मत वळविण्याचा प्रकार असून इंडिया आघाडीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)