एक्स्प्लोर

G20 Summit 2023: घटनेतून 'इंडिया' नाव वगळण्याच्या हालचाली? जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप

President Of India Controversy: . राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे.

नवी दिल्ली:  राजधानी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या जी 20 (G-20) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.   पण याच जी  20  परिषदेमुळे काँग्रेसने  केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. G20 डिनरच्या  निमंत्रण पत्रीकेवर काँग्रेसचा आक्षेप आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती  भवनात G20 डिनरचं  आयोजन करण्यात आले आहे. या  निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते जयराम  रमेश यांनी ट्वीट  करत  संताप व्यक्त केला आहे. 

जी-20 डिनरसंदर्भात राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर  'President Of India' ऐवजी  'President Of Bharat' लिहल्याचा दावा  काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले, "संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया  आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु   आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे."

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केली आहे. बंगळूरमध्ये 18 आणि 19 जुलैला झालेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव जाहीर केलं .INDIAN NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE अर्थात I.N.D.I.A. त्यानंतर  इंडिया हा शब्द चांगलाच चर्चेत आला. सत्ताधारी पक्ष भाजपने या नावावरून अनेकदा विरोधकांवर टीका केली आहे.

भाजप खासदार हरनाथ सिंह म्हणाले, इंडियाचा उल्लेख भारत करावा अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. इंग्रजांनी इंडिया हा शब्द अपमान करताना वापरला होता. याउलट भारत हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळे संविधानात बदल होणे गरजेचे आहे. 

G20 Summit 2023: घटनेतून 'इंडिया' नाव वगळण्याच्या हालचाली? जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप

देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची काँग्रेसला शंका आहे. राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आह. 

हे ही वाचा:

'केंद्रातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडू नये', विशेष अधिवेशनासाठी मोदी सरकारचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget