(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon : अवकाशातून उपग्रहाचे अवशेष पडून घराला आग, जळगावातील कुटुंबाचा दावा
Jalgaon News : जळगाव शहरातील अयोध्यानगर भागात राहणाऱ्या भगवान उके यांच्या घरावर एक पेटती वस्तू पडल्याची घटना समोर आली. त्या ठिकाणी खड्डा पडून भिंतीला देखील तडा गेल्याचा दावा भगवान उके यांनी केला आहे.
Jalgaon News : महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच अनेक भागात आकाशात उल्कापात सदृश्य रोषणाई पाहायला मिळाली होती. तसेच अवकाशातून काही अवशेष पडल्याची घटनाही चंद्रपूर येथे समोर आले होते. या घटनेबाबत वेगवेगळे तर्क वितरक लावले जात असताना जळगावातही अशीच एक घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील अयोध्या नगर भागात राहणाऱ्या भगवान उके यांच्या घरावर एक पेटती वस्तू पडल्याची घटना समोर आली आहे. उके यांच्या घरावर पेटती वस्तू पडल्याने त्या ठिकाणी खड्डा पडला आणि भिंतीला देखील तडा गेल्याचा दावा भगवान उके यांनी केला आहे. अवकाशातून एखाद्या उपग्रहाचे हे अवशेष असावे असा अंदाज देखील भगवान उके यांनी यावेळी व्यक्त केला आहे. उके यांच्या या दाव्याने संपूर्ण जळगाव जिल्हयात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
भगवान उके हे जळगाव शहरातील अयोध्या नगर भागातील रहिवासी आहेत. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या वर आग लागली. त्यांनी शेजाऱ्यांनी फोन करून हे चित्र त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. उके यांनी आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी छोटी आग लागलेले दिसली. मात्र या ठिकाणी आग छोटी असल्याने आणि आग पसरण्याची भीती नव्हती. उके कुटुंबाने आग विझविण्याचा हालचाली सुरू करताच काही मिनिटात ही आग विझली. या घटनेनंतर उके परिवाराने या आगीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
दरम्यन, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूरमध्ये काही अवकाशातून पडलेले काही अवशेष पडल्याची माहिती त्यांना माध्यमातून मिळाली. यानंतर त्यांनी त्यांच्या घराच्या आग लागल्या ठिकाणी जागी जाऊन पाहणी केली असता त्यांना धक्का बसला. ज्या ठिकाणी ही आग लागली होती, त्या ठिकाणी त्यांना सिमेंट काँक्रिटमध्ये चक्क दोन ते तीन इंचाचा खड्डा पडला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
तसेच आग लागलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची राख आढळून आली नाही. मात्र तिथे लाखेसारखा कडक पदार्थ आढळून आला आहे. लहान आगीने सिमेंट काँक्रिटच्या भिंतीला गेलेला तडा आणि पडलेला खड्डा याचा विचार करता ही आग सर्वसाधारण आग नसल्याचं उके यांच्या लक्षात आल्यावर ही आग म्हणजे आकाशातून पडलेल्या अवशेषामुळे लागली असल्याचं त्यांना वाटू लागले आहे.
या आगीबाबत अधिक संशोधन व्हावे आणि या घटनेमागची सत्यता समोर यावी यासाठी भगवान उके यांनी या ठिकाणी आढळून आलेले अवशेष आता प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेसंदर्भात 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांनाही लागलेल्या आगीच्या जागी दोन इंच खड्डा पडल्याचं आणि या ठिकाणी लाख सदृश्य जळालेला पदार्थ आढळून आल्याचं दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Jammu Kashmir Attack : दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितांवर निशाणा, एका दिवसात तिसरा हल्ला
- Russia Ukraine War : बुचा शहरात रस्त्यांवर मृतदेहांचा खच, चर्चजवळ 45 फुट लांब स्मशानभूमी, सॅटेलाईट फोटोंमधून दिसला नरसंहार
- Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शनं सुरूच, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha